Items seized during raid by Liquor Prohibition Department were seized
Items seized during raid by Liquor Prohibition Department were seized  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : शेतातील बनावट दारुचा कारखाना उध्वस्त

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भुसावळ पथकाने ओझरखेडा शिवारातील तलावा जवळील एका खासगी शेतात छापा टाकून बनावट देशी, विदेशी मद्यनिर्मितीचा कारखाना उघडकीस आणला असून या कारवाईत एका संशयितांसह ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. (jagaon factory of fake local liquor was unearthed in raid at private farm near Ozarkhed)

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक जळगाव डॉ. व्ही. टी. भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, यांच्या पथकाने गुरुवारी (ता. १५ ) रात्री तालुक्यातील ओझरखेडा शिवारात तलावा जवळील खासगी शेतात अवैधरीत्या बनावट देशी दारूचा कारखान्यावर कारवाई केली.

बनावट मद्य बाटलीत भरण्यासाठी वापरलेली मशीन, बनावट मद्य भरलेल्या बाटल्या व बनावट लेबल सीलबंद करण्याची मशिन, देशी दारू संत्रा ९० मिलि क्षमतेच्या ५५००० सिलबंद बाटल्यांचे ५५० कागदी खोके, २०० लिटरच्या दहा प्लॅस्टिक बॅरल देशी मद्य तयार भरलेले दोन प्लॅस्टिक टाक्या.

देशी दारू रॉकेट संत्राचे नाव छापलेले १५०० कागदी पुठ्याचे खोके, ६६००० रिकाम्या प्लास्टिक बाटल्या (एकूण ६६ खोके) संत्रा देशी मद्याच्या बाटलीचे ५०००० पन्नी बुचे (एकूण १० खोके) बाटलीला बूच सिलबंद करण्याची अॅटोमॅटीक यंत्र बाटलीस पत्री बुच सिलबंद करण्याची मॅन्युअल यंत्र मोटरसह मद्याचे ब्लेंड मिक्सिंग यंत्र, तीन हायड्रोमीटर मथची तीव्रता मोजण्यासाठी यंत्र.

दहा प्लॅस्टीक ट्रे, देशी मद्यास स्वाद,आणण्यासाठीचे पाच लिटर लेमन ईसेंस (लिंबुचा अर्क), संत्रा देशी मद्याचे ७० हजार लेबल, १७ दारूचा वास येत असलेले प्लॅस्टीक रिकामे बॅरल, पाणी शुद्धीकरण यंत्र, असा सुमारे ४५ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या गुन्ह्यात एका संशयिताला अटक केली असून, फरार संशयिताचा शोध सुरू आहे. या कारवाईत देशी आणि विदेशी मद्य बनावट रासायनिक द्रव्य वापरून तयार करण्यात आढळल्याने बनावटी मद्य बाटल्यांत भरून त्यावर लेबल लाऊन विक्रीला पाठवत असल्याचे दिसले.

दारू तयार करणारे रसायन अन्य सामग्री विविध यंत्र असा लाखों रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुजित कपाटे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT