gold theft esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पाॅलिश करण्याच्या बहाण्याने लांबविले दागिने

सकाळ वृत्तसेवा

कासोदा : विश्वास संपादन करून सोन्याच्या दागिन्यांना पाॅलिश करण्याच्या बहाण्याने ६० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. ही घटना शनिवारी (ता. १४) सकाळी अकरा ते साडेअकरादरम्यान वनकोठे (ता. एरंडोल) येथे घडली. याबाबत कासोदा पोलिसांत चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

येथून जवळच असलेल्या वनकोठे येथील नागेश्र्वर शेनपडू पाटील घरी नसताना चोरट्यांनी नागेश्र्वर पाटील यांच्या आईला घरातील देवांना पाॅलिश करून देतो, असे सांगितले. देवांना पाॅलिश करून विश्वास संपादन केला.

लिक्विड शिल्लक राहिल्याचे सांगत तुमचे सोन्याचे दागिने पाॅलिश करून देतो, असे सांगितले व त्यांच्याजवळील ४ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, ३ ग्रॅमची पोत, २ ग्रॅमचे पँडल, १ ग्रॅमचे मनी, २ ग्रॅम सोन्याचे कानातील लटकन, ५ ग्रॅमचे कानातील सोन्याचे काप, असे एकूण अंदाजे ६० हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन दुचाकीवरून पोबारा केला.

याबाबत नागेश्र्वर शेनपडू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासोदा पोलिसांत चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी युवराज कोळी, जितेश पाटील, समाधान तोंडे, प्रवीण हटकर, इम्रान पठाण तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan : अखेर विसर्जन मिरवणुकीचा वाद मिटला; सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार मिरवणूक

Online Gaming Bill News : मोठी बातमी! राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंग’ विधेयकाला दिली मंजुरी

Maharashtra Latest News Live Update : मांजरी खुर्दमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा वारसा चालवत असल्याच्या टिमक्या...; आनंद परांजपे यांची शिवसेनेवर जहरी टीका, काय म्हणाले?

"माझा घटस्फोट झालेला नाही" मराठी अभिनेत्रीने चर्चांवर मौन सोडत केली ट्रोलर्सची बोलती बंद; म्हणाली..

SCROLL FOR NEXT