Police team with arrested suspect.
Police team with arrested suspect. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : रिक्षात बसवून प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : औद्योगिक वसाहत परिसरातील मीनाक्षी गोल्ड या चटई कारखान्यात कार्यरत दोन भाऊ रिक्षाने रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रिक्षात बसले होते. रिक्षा रेल्वेस्थानकावर न घेऊन जाता या दोघा भावंडांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडून रोकड हिसकावून घेण्यात आली होती. एमआयडीसी पोलिसांनी नुसत्या वर्णनावरून संशयितांचा शोध लावून त्यांना अटक केली आहे. (Jalgaon Crime Two arrested for robbing passengers in rickshaw)

औद्योगिक वसाहत परिसरातील या कारखान्यात नीलेश रामलाल शिलारे (२९, रा. रामटेक रय्यद, जि. हरदा, मध्यप्रदेश) हा व त्याचा भाऊ शिवा असे कार्यरत आहेत. दोघे सध्या रायपुर कुसुंबा येथे वास्तव्यास आहेत. होळीचा सण येत असल्याने गावाकडे जाऊन यावे म्हणून नीलेश व शिवा शेलारे या दोघांनी कारखान्यातून सुट्टी घेतली.

गोळा केलेला थोडा पगार सोबत घेऊन ९ मार्चला दोघेही रात्री रेमंड चौकातून रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षाला थांबवून त्यात बसले. या रिक्षात पूर्वीपासून एक संशयित बसलेला होता. रिक्षाचालकाने रिक्षा मुद्दाम अजिंठा चौकातून खेडी पेट्रोलपंपाच्या दिशेने पिटाळली.

दोघा भावंडांना खेडी पंपाजवळ अंधारात नेत मारहाण करून त्यांच्या खिशातील पाच हजारांची रोकड काढून घेत पिटाळून लावले होते. एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नेांद करण्यात आल्यावर तपासाला सुरवात झाली.

नुसत्या वर्णनावर लागला तपास

नीलेश शेलारे या तक्रारदाराला त्या रिक्षाचा नंबर आठवत नव्हता. मात्र, त्याने रिक्षाचे आतून बाहेरून वर्णन सांगून मारहाण करणाऱ्याचा पूर्व अंदाज तक्रार नोंदवताना पोलिसांना दिला होता. निरीक्षक बबन अव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार शोध सुरू असताना गुप्त बातमीदाराने माहिती कळविल्यावर आव्हाड यांच्या पथकातील उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे.

नीलेश गोसावी, दीपक जगदाळे यांच्यासह सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किरण पाटील,राहुल रगडे, विशाल कोळी, राहुल पाटील, ललित नारखेडे, साईनाथ मुंढे अशांच्या पथकाने रिक्षाचा शोध घेत रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. दोघांची कायदेशीर ओळख परेड बाकी असून दोघांनी गुन्ह्याची कबुली मात्र दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT