District Milk Union election esakal
जळगाव

Jalgaon District Milk Union Election : पालकमंत्री पाटील, खडसे, डॉ. पाटलांचे अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. ७) पालकमंत्री गुलाबराव पाटील, विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी खडसे, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यासह २२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर १५२ अर्जांची विक्री झाली.

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. उमेदवारी अर्ज घेण्याचा व दाखल करण्याचा सोमवारी तिसरा दिवस होता. यापूर्वी पहिल्या दिवशी ७९, दुसऱ्या दिवशी ८५, तर सामेवारी तब्बल १५२ अर्जांची विक्री झाली. आजपर्यंत तब्बल ३१६ अर्जांची विक्री झाली आहे. १० नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. (Jalgaon District Milk Union Election Guardian Minister Patil Khadse Dr patil Applications filed Jalgaon news)

पालकमंत्र्यांसह २२ अर्ज दाखल

जिल्हा दूध संघासाठी आजपर्यंत संजय पवार व सोनल पवार यांचेच अर्ज दाखल झाले होते. मात्र, सोमवारी तब्बल २२ अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करणारे उमेदवार असे ः मंदाकिनी खडसे (मुक्ताईनगर तालुका), गुलाबराव पाटील (जळगाव तालुका), डॉ. सतीश पाटील (पारोळा तालुका), विजय रामदास पाटील (वि.जा.भ.ज.वि.मा.प्र.), विजय पाटील (पाचोरा तालुका), पूनम प्रशांत पाटील (महिला राखीव), पूनम प्रशांत पाटील (भडगाव तालुका), हेमराज चौधरी (यावल तालुका), मधुकर राणे (बोदवड तालुका), स्मिता वाघ (अमळनेर तालुका), भैरवी पलांडे (महिला राखीव), मनीषा पाटील (महिला राखीव), ओंकार मुंदडा (धरणगाव तालुका), रमेश पाटील (जळगाव तालुका).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: 7 वर्षं गुहेत जगली, मुलींना कसं सांभाळलं? किराणा कशी आणायची... संपूर्ण कहाणी ऐकून बसेल धक्का, रशियन महिलेचा व्हिडिओ

माेठी चाेरी! 'राहुरीतील सराफा दुकान फाेडले'; ३२ तोळे सोने, ३० किलो चांदीच्या दागिन्यांसह ६० लाखांचा ऐवज चोरीस

BSE Bomb Blast Threat : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी; बीएसईच्या वेबसाईटवर ईमेल अन् पोलिस अलर्टवर

'हॅरी पॉटर' टीव्ही मालिकेतील हॅरी पाहिलात का? फस्ट लूक व्हायरल, फोटो पाहून तुम्हालाही बालपणाची आठवण येईल

Vilas Bhumre: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री, संभाजीनगरकडे विशेष लक्ष देणार

SCROLL FOR NEXT