Mahait Company
Mahait Company esakal
जळगाव

Caste Certificate Issue : तांत्रिक घोळामुळे मराठा जात प्रमाणपत्र मिळेना!

सुधाकर पाटील

Caste Certificate Issue : शासनाने मोठ्या थाटात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप शासनाच्या ‘डीआयटी’ विभागाकडून जात प्रमाणपत्राचा नमुनाच महाआयटी कंपनीला आला नसल्याने राज्यातील मराठा तरुणांना मराठा जात प्रमाणपत्र मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. पोलिस भरतीचा अर्ज करण्यासाठी ३१ मार्च शेवटची मुदत आहे. अजून जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने मराठा आरक्षणाचा फायदा काय? असा प्रश्न राज्यातील मराठा तरुणांकडून उपस्थित होत आहे. (Jalgaon Maratha caste certificate is not available due to technical confusion)

मोठ्या आंदोलनानंतर शासनाने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात ११ मार्चला शासनाने शासन निर्णयही जाहीर केला. मात्र प्रत्यक्षात अजूनपर्यंत नवीन शासन निर्णयानुसार मराठा तरुणांना मराठा जातीचा दाखला मिळत नसल्याचे चित्र आहे. याबाबत शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून अर्थात, ‘डीआयटी’कडून सूचना आलेल्या नसल्याने हा घोळ झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रमाणपत्र मिळेना

शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात निर्णय होऊन दहा दिवस झाले, तरी मराठा तरुणांना मराठा जात प्रमाणपत्र मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मराठा तरुणांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याबाबत महाआयटी कंपनीचे जिल्हा समन्वयक स्वप्नील पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की शासनाच्या ‘डीआयटी’ विभागाकडून ‘महाआयटी’ला अद्याप मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात सूचना आलेल्या नाहीत.

त्यांच्याकडून या संदर्भात फॉर्मेट वा बदलाबाबत सूचना आल्यास तत्काळ मराठा जात प्रमाणपत्र जनरेट होऊन वितरित करणे शक्य होणार आहे. आम्ही त्यांच्या सूचनांची वाट पाहत आहोत. मग प्रश्न असा उपस्थित होतो, की शासनाने निर्णय घेऊनही शासनाच्याच विभागाकडून एवढी दिरंगाई का होत आहे? महाआयटी कंपनीच्या संकेतस्थळावर जुन्या शासन निर्णयाचा जात प्रमाणपत्राचा फॉर्मेट उपलब्ध आहे. मग नव्या निर्णयानुसार फॉर्मेट का टाकला जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (latest marathi news)

शासनाने लक्ष देण्याची गरज

राज्य शासनाच्या ‘डीआयटी’ विभागाने तत्काळ याबाबत लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याबाबत महाआयटी आणि डीआयटीत बैठकाही झाल्या आहेत. मात्र तरीही याबाबत निर्णय मार्गी लागताना दिसत नाही. शासनाने ११ मार्च शासन निर्णयासोबत नॉन क्रिमिलियरचा फॉर्मेट दिला आहे. मात्र जात प्रमाणपत्राचा दिलेला फॉर्मेट दिलेला नाही. ‘डीआयटी’ने तत्काळ याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

पोलिस भरतीत मराठा आरक्षणापासून वंचित?

शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या पोलिस भरतीत मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र प्रत्यक्षात तांत्रिक अडचणीमुळे तरुणांना जात प्रमाणपत्रच मिळत नसल्याने भरतीत मराठा आरक्षणात फार्म कसा भरायचा? असा प्रश्न त्याच्यांसमोर पडलेला आहे. ३१ मार्च पोलिस भरतीसाठी फार्म भरण्याची शेवटची मुदत आहे.

आता सलग तीन दिवस सुट्या आहेत. अद्यापपर्यंत मराठा जात प्रमाणपत्राचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे मराठा तरुण भरतीत मराठा आरक्षणापासून वंचित राहण्याचे चिन्हे आहेत. तांत्रिक अडचण पाहता भरतीचा फार्म भरण्यास मुदतवाढ मिळण्याची मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT