IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

England Players Availability for IPL: आयपीएल अखेरच्या टप्प्यात असताना इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतले आहेत, याबाबत पंजाब किंग्सच्या प्रशिक्षकांनी भाष्य केले आहे.
Punjab Kings | IPL 2024
Punjab Kings | IPL 2024Sakal
Updated on

IPL 2024, Punjab Kings: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आहे. असे असतानाच काही संघांना मोठे धक्के बसले आहेत, कारण इंग्लंडचे अनेक खेळाडू राष्ट्रीय संघाप्रती असलेल्या वचनबद्धतेमुळे मायेदशी परतले आहेत. याचा सर्वाधिक धक्का पंजाब किंग्सला बसला, कारण त्यांच्या संघात अनेक इंग्लंडचे खेळाडू होते.

दरम्यान, इंग्लंडचे खेळाडू आयपीएल अंतिम टप्प्यात असताना मायदेशी परतल्याने अनेकांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डावर टीका केली आहे.

अशातच पंजाब किंग्सचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी सांगितले की इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यापूर्वी त्यांचे खेळाडू संपूर्ण आयपीएल 2024 हंगामासाठी उपलब्ध असतील, याची खात्री दिली होती. मात्र, स्पर्धेचा कालावधी थोडा वाढल्याने त्यांना त्यांच्या योजनेत बदल करावा लागला.

इंग्लंडला 22 मे पासून पाकिस्तानविरुद्ध 4 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. त्यानंतर हे दोन्ही संघ टी20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी येतील. त्याचमुळे इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतले आहेत.

Punjab Kings | IPL 2024
MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

दरम्यान, इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयाबद्दल रविवारी पत्रकार परिषदेत संजय बांगर यांनी सांगितले की ' जेव्हा लिलाव झाला होता, तेव्हा इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले होते की त्यांचे सर्व खेळाडू उपलब्ध असतील. पण त्यानंतर स्पर्धेचा कालावधी थोडा वाढला, मी म्हणेल यासाठी अनेक कारणे होती. सर्वजण एकाच स्थितीत होते, पण आम्ही इंग्लिश क्रिकेटपटूंना गमावले.'

पंजाब संघात जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन असे इंग्लंडचे खेळाडू होते. तसेच प्लेऑफमध्ये पोहचलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघातील फिल सॉल्ट, राजस्थान रॉयल्सचा जॉस बटलर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील विल जॅक्स हे इंग्लिश खेळाडूही मायदेशी परतले आहेत. त्यामुळे ते प्लेऑफसाठी उपलब्ध नसणारेत.

दरम्यान, पंजाबला फक्त इंग्लिश खेळाडू परत जाण्यानेच नाही, तर इतर खेळाडूंना झालेल्या दुखापतीचाही फटका बसला. शिखर धवन 5 सामने खेळल्यानंतर दुखापतग्रस्त झाला. त्याच्या जागेवर सॅम करनने नेतृत्व केले. पण तोही मायदेशी परतल्यानंतर अखेरच्या साखळी सामन्यात पंजाबचे नेतृत्व जितेश शर्माने केले. तसेच कागिसो रबाडाही दुखापतीमुळे मायदेशी गेला.

Punjab Kings | IPL 2024
CSK IPL 2024 : थालाच्या किल्ल्याला 'या' हंगामात का लागला सुंरग? जाणून घ्या CSK प्ले-ऑफमध्ये न जाण्याची कारणे

विशेष म्हणजे अनेक परदेशी खेळाडू उपलब्ध नसल्याने रविवारी पंजाबने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये रिली रुसौ या एकमेव परदेशी खेळाडूला संधी दिली होती. प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव परदेशी खेळाडूला संधी देणारा पंजाब पहिलाच संघ ठरला.

खेळाडूंच्या दुखापतीबद्दल बांगर म्हणाले, 'आम्ही लिव्हिंगस्टोनला त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे गमावले, त्याला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने परत बोलावले. कागिसो रबाडालाही इन्फेक्शन झाले आणि त्याला परत दक्षिण आफ्रिकेला जावे लागले.'

'या काही गोष्टी एकत्र आल्या आणि आम्हाला शेवटच दोन सामने खेळताना आंतरराष्ट्रीय खेळाडूंची कमी जाणवली. त्यामुळे आम्हाला फटका बसला. पण आमच्यासाठी हा हंगाम चांगला न ठरण्याचे हे एकमेव कारण नाही.'

पंजाबने आयपीएल 2024 मध्ये 14 सामन्यांपैकी 5 विजय आणि 9 पराभव स्विकारले. त्यामुळे ते 10 पाँइंट्ससह नवव्या क्रमांकावर राहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.