घरफोडले
घरफोडले 
जळगाव

सहाय्यक कृषी अधीकाऱ्याचे घरफोडले ; दोघा अल्पवयीन भामट्यांना अटक 

रईस शेख

जळगाव, :  रिंगरोड परिसरातील दिनानाथ वाडी भागात वास्तव्यास असलेले सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे पंधरा हजाराचा ऐवज लंपास केला होता़ दरम्यान, याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असुन दोघांकडून दहा हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़

सहाय्यक कृषी अधिकारी अनिल किशोर पाटील हे रिंगरोड परिसरातील दिनानाथ वाडी भागात कुटूंबीयांसह वास्तव्यास आहे़ मात्र, मार्च ते जूनपर्यंत त्यांचे घर बंद होते़ त्यामुळे बंद घर पाहून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून चांदीचे वाट्या तसेच इतर काही ऐवज चोरून नेला होता़ नंतर याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़

बिलाल चौकातून अटक
सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या घरात डल्ला मारणारे दोन अल्पवयीन मुलं असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली़ त्यांनी त्या मुलांची माहिती काढून गुरूवारी रात्री दोघांना तांबापुरा भागातील बिलाल चोकातून ताब्यात घेतले़ दोघांची कसून चौकशी सुरू असून आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे़ ही कारवाई जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक अकबर पटेल यांच्या मागदर्शनाखाली नाना तायडे, संदीप पाटील, प्रवीण भोसले, प्रशांत जाधव, अविनाश देवरे, गोविंदा पाटील, हेमंत जाधव, इम्रान सैय्यद यांनी केली आहे़

दहा हजाराचा मुद्देमाल 
दोघा अल्पवयीन चोरट्यांना पोलीस खाकी दाखविताच त्यांनी दहा हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला आहे़ तर चोरीनंतर दोघांनी अर्धा-अर्धा ऐवज वाटून घेतले होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली़ भंगार विक्री करण्याच्या बहाण्याने रेकी करून नंतर बंद घरांमध्ये डल्ला मारण्याची पध्दती वापरीत असल्याचीही माहिती त्यांनी पोलिसांना दिली़ 
-------पूर्ण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईने जिंकली नाणेफेक! जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग ११

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT