Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

ममता यांचा दीड महिन्यांपूर्वीच एक अपघात झाला होता. यात त्या जखमी झाल्या होत्या. रिपोर्टनुसार, ममता बॅनर्जी या घरात पडल्या होत्या.
Mamata Banerjee
Mamata Banerjee

कोलकाता- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांना निवडणूक प्रचारादरम्यान किरकोळ दुखापत झाली आहे. ममता बॅनर्जी या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दुर्गापूरमध्ये आल्या होत्या. तेथून त्या इतर ठिकाणी एका सभेसाठी हेलिकॉप्टरमधून जाणार होत्या. ममता हॅलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी पायऱ्या चढत असताना त्यांचा पाय निसटला अन् त्यांचा तोल गेला. त्या समोरच्या बाजूला पडल्या. या अपघातात त्यांना किरकोळ जखम झालीये.

एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, ममता या हेलिकॉप्टरच्या दिशेने जातात. हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी त्या पायऱ्या चढत असतात, अचानक त्यांचा पाय निसटला अन् त्यांचा तोल गेला. त्या हेलिकॉप्टरमधील समोरच्या सीटवर पडतात. त्याठिकाणी उपस्थित सुरक्षा कर्मचारी त्यांना सांभाळतात. यात ममतांना किरकोळ दुखापत झाल्याचं समजतंय.

Mamata Banerjee
Fact Check: ममता बॅनर्जी यांचं खरं नाव मुमताज खातून नाही! व्हायरल होत असलेला दावा खोटा

दरम्यान, ममता यांचा दीड महिन्यांपूर्वीच एक अपघात झाला होता. यात त्या जखमी झाल्या होत्या. रिपोर्टनुसार, ममता बॅनर्जी या घरात पडल्या होत्या. अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ११ मार्च रोजीची ही घटना आहे. त्यानंतर आता ४४ दिवसांनी ममता पुन्हा जखमी झाल्या आहेत.

Mamata Banerjee
ममता सरकारला झटका! हायकोर्टाच्या निर्णयामुळे 25 हजार शिक्षकांची भरती रद्द, पगार करावा लागणार परत

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com