Collector Ayush Prasad while giving instructions in the meeting of banks.
Collector Ayush Prasad while giving instructions in the meeting of banks. esakal
जळगाव

Jalgaon News : केळीच्या खोडापासून धागा,खत अन् कोळसा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कृषी व पूरक व्यवसायात जिल्ह्याच्या आर्थिक परिवर्तनाची ताकद आहे. त्याकडे बँकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. केळीच्या खोडापासून धागा, सेंद्रिय खत तसेच कोळसा निर्मिती शक्य आहे. क्षमता असलेल्या प्रत्येक गावात प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी बँकांनी साहाय्य करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. जिल्ह्यातील सर्व बँकांच्या क्षेत्रीय व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. (jalgaon news Yarn fertilizer and coal from banana trunk marathi news)

जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील, जिल्हा व्यवस्थापक अग्रणी बँक प्रणवकुमार झा, नाबार्ड जिल्हा समन्वयक, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक, संचालक आत्मा, 'एमएसएमई'चे नोडल अधिकारी, उपस्थित होते. श्री. प्रसाद म्हणाले, की जामनेरला सुमारे ४ हजार शेततळे मंजूर आहेत. त्यापैकी बाराशे शेततळे यावर्षी तयार होतील. तेथे मत्स्य व्यवसायाला संधी निर्माण होईल, त्यासाठी विविध सहकारी संस्थांना लक्ष्य करून रोजगार निर्मितीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा.

ओमेगा थ्री फॅटी ऍसिड उद्योग देखील तेथे उभारता येईल. विशिष्ट बचत गट किंवा शेतकरी ऑर्गनायझेशन यांच्या साहाय्याने ओमेगा थ्री फॅटी ऍसिड उद्योगाची चाचपणी करण्यात येईल. मत्स्यपालन बरोबर पशुपालन व्यवसायाचे देखील लक्ष पूर्ण करण्याचे सांगितले. पशुधनाच्या लसीकरण शिबिरात सामील व्हा. (latest marathi news)

रेशीम उत्पादनासाठी जामनेर तालुका योग्य असून तेथून छत्रपती संभाजीनगर मार्गे जालना मार्केटला पोहोचणे सोपे असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पाटील यांनी सांगितले. पुढील आर्थिक वर्षासाठी बँकांचा क्षेत्रनिहाय, योजनानिहाय पत आराखड्याचे सादरीकरण झाले. कृषीसाठी केसीसी करण्यात शंभर टक्के लक्ष साध्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

बैठकीत सूचना

- बचत गटांना फुल शेतीसाठी आर्थिक सहाय्य

- दूध शीतकरण केंद्रांना दूध प्रक्रिया उद्योगाला जोडण्यासाठी आर्थिक साहाय्य

- मजुरांच्या समूहाला यांत्रिकी साहित्य खरेदीसाठी मदत

- मजुरांचे समूह शेती कामाला सेवा पुरवतील

- शेतीचे कामे जलद होतील आणि त्यांना त्यातून रोजगार मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT