HSC Exam
HSC Exam  esakal
जळगाव

HSC Exam 2024 : बारावीच्या परिक्षा आजपासून; जिल्हा प्रशासनातर्फे तयारी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : उच्च माध्यमिक शालांत परिक्षा (बारावी) बुधवार (ता.२१) पासून सुरू होत आहे. यंदा बारावीसाठी जिल्ह्यात ४८ हजार २७३ परीक्षार्थी आहेत. कॉपी मुक्त परीक्षेसाठी आठ भरारी पथके नियुक्त केली आहेत. जिल्हा प्रशासनाने सर्वच परिक्षा केंद्रावर बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस, होमगार्ड यांची मदत घेण्यात आली आहे. (HSC Exam start from today)

बारावीच्या परिक्षेसाठी २७ हजार ७६८ मुले तर २० हजार ५०५ मुली असे एकूण ४८ हजार २७३ परीक्षार्थी आहेत. या परिक्षेसाठी ७८ परिक्षा केंद्र आहेत. नेमलेल्या आठ भरारी पथकात प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, महिला अधिकारी, आदी विभागाची पथके तयार करण्यात आली आहेत. एका पथकात सात ते आठ अधिकारी आहेत.

शाखा निहाय विद्यार्थी असे -

विज्ञान शाखा : २५ हजार ३१२

कला : १६ हजार २४४

वाणिज्य : ५ हजार १६१

व्यावसायीक : १ हजार ५२३

आयटीआय : ३२

एकूण : ४८ हजार २७३

असे आहेत पेपर

२१ फेब्रुवारीपासून बारावीची परिक्षा सूरू होत आहे. पहिला पेपर इंग्रजीचा आहे. २२ ला हिंदी, २३ ला मराठी, २४ ला मराठी प्राकृत/संस्कृत, २६ ला वाणिज्य संघटन, २७ ला भौतिकशास्त्र, २८ ला गृहव्यवस्थापन, २९ फेब्रुवारीला रसायनशास्त्र, २ मार्चला गणित, ४ ला बालविकास, कृषी विज्ञान, ५ ला सहकार, ६ मार्चला जीवशास्त्र विषयाचा पेपर आहे.

"जिल्ह्यात बारावीची परिक्षा २१ फेब्रुवारीपासून सूरू होत आहे. आपण कॉपी मुक्त परिक्षा अभियान राबवीत आहोत. विद्यार्थ्यांनी परिक्षा शांततेत व कॉपी न करता द्यावी. पर्यवेक्षक, केंद्र चालकांनीही कॉपीला प्रोत्साहन देवू नये.

परिक्षा केंद्राच्या पाचशे मिटर परिसरातील फोटोकॉपीची दुकाने परिक्षा काळात बंद राहतील. पोलिस, होमगार्ड यांनीही कॉपीमुक्त अभियान यशस्वी करावे."- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT