Dilip Patil
Dilip Patil esakal
जळगाव

Gas Cylinder Explosion : सिलिंडरच्या स्फोटात एकाचा होरपळून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : तालुक्यातील पिंपळी येथे सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना होळीच्या दिवशी सायंकाळी साडेसहाला घडली. सणाच्या दिवशी ही घटना घडल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. दिलीप नामदेव पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. होळीच्या दिवशी सायंकाळी दिलीप पाटील यांच्या घरात अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी आले. (Jalgaon Gas cylinder explosion)

यातच घराचे संपूर्ण छत लाकडी असल्याने आणि घरात कापूस साठवून ठेवला असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. आगीने संपूर्ण घर जळत असताना दिलीप पाटील यांच्या पत्नी, मुलगा आणि नात तातडीने घराच्या बाहेर पळत आले.

मात्र आगीमुळे दिलीप पाटील यांना चक्कर आल्याने ते घरात अडकून पडले. आगीने संपूर्ण घर ताब्यात घेतल्याने श्री. पाटील यांना बाहेर पडता आले नाही. (latest marathi news)

घराला आग लागल्याचे समजताच स्थानिकांना मिळेल त्या साधनाचा वापर करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही.

घटनेची माहिती अमळनेर अग्निशमन विभागाला मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोचत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत दिलीप पाटील यांचा होरपळून मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक विकास देवरे आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी येत दिलीप पाटील यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT