Silver Rates Hike esakal
जळगाव

Jalgaon Silver Rates Hike : चांदीची लखाखी लाखाकडे! GST सह भाव 93 हजार 730; मेमध्ये 9300 रुपयांची वाढ

Jalgaon News : देशात महागाईचा वाढता दबाव आणि सर्वच औद्योगीक क्षेत्रात मागणी वाढल्यामुळे चांदीच्या भावात वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Silver Rates Hike : सध्या जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या भावात तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याप्रमाणेच चांदीचे भाव वाढत आहेत. चांदीच्या लखाखीची एक लाखाकडे वाटचाल सुरू आहे. मे महिन्याच्या केवळ १८ दिवसांत तीन टक्के जीएसटीएसह शुद्ध चांदीचे प्रतिकिलो भाव ९ हजार ३७३ रुपयांनी वाढून ९३ हजार ७३० रुपयांवर पोहोचले आहेत. (Jalgaon Silver soon to lakhs)

देशात महागाईचा वाढता दबाव आणि सर्वच औद्योगीक क्षेत्रात मागणी वाढल्यामुळे चांदीच्या भावात वाढ झाली आहे. नवीन वर्षांत औद्योगीक क्षेत्रात चांदीचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी, चांदीच्या भावात हळूहळू वाढ होऊ लागली.

मेमधील दरवाढीची स्थिती पाहिल्यास १ मेस चांदीचा भाव जीएसटीविना ८१ हजार ९०० रुपये किलो होता. ४ मेपर्यंत ८० हजार ६०० रुपयांपर्यंत कमी झाला. ६ मेस ८२ हजार ३०० रुपयांवर गेला. ८ मेपर्यंत भाव ८२ हजार ५०० रुपयांवर स्थिर होता. ९ मेस ८०० रुपयांनी वाढून ८३ हजार ३०० रुपयांवर पोहोचले.

१० मेस अचानक दोन हजारांची वाढ होऊन ८५ हजार ३०० रुपयांवर भाव पोहोचला. ११ ते १४ मेदरम्यान चांदीचा भाव ८५ हजारांखाली अर्थात ८४ हजार ९००पर्यंत खाली आला. १५ मेस चांदीत ४०० रुपयांची वाढ होऊन ८५ हजार ३०० रुपयांवर गेले. १६ मेस चांदीत दीड हजाराची किलोमागे वाढ झाली.

१७ मेस दोन हजार २०० रुपयांची वाढ होऊन चांदी ८९ हजारांवर पोहोचली. १८ मेस पुन्हा १,७०० रुपयांची वाढ होऊन ३ टक्के जीएसटीसह प्रतिकिलो भाव ९३,४२१ रुपयांवर पोचला. चांदी एक लाखाचा भाव किती दिवसांत गाठते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (latest marathi news)

प्रतिकिलो चांदीचे भाव : (विना जीएसटी)

१ मे : ८१ हजार ६००

६ मे : ८२ हजार २००

९ मे : ८३ हजार ३००

१० मे : ८५ हजार ३००

१३ मे : ८४ हजार

१५ मे : ८५ हजार ३००

१६ मे : ८६ हजार ८००

१७ मे : ८७ हजार

१८ मे : ९१ हजार

"गेल्या १५ दिवसांत चांदीच्या भावात रोज वाढ नोंदविली आहे. सकाळी वेगळा दर, तर दुकान बंद करताना वेगळेच भाव असतात. सोमवारीही भावात उच्चांकी नोंदवली गेली. सोने आणि चांदी दोघांचे भाव आंतराष्ट्रीय बाजारात ठरविले जातात. स्थानिक पातळीवर सराफा बाजारांत लोकांचा वाढता कल गुंतवणुकीतच आहे. पाहिजे तेव्हा विक्री करून पैसा मोकळा करता येण्यासाठी सोने आणि चांदी उत्तम पर्याय बनले आहेत."

-भरत लाठीगिरा (सोनी), सराफा व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकण रेल्वेच्या शिल्पकाराला मानाचा मुजरा! सावंतवाडी स्टेशन ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ होणार; सरकारचा मोठा निर्णय

Monsoon Arrival Maharashtra : मॉन्सून आगमनाची तारीख बदलली, ८ ते १० जूनदरम्यान महाराष्ट्रात पाऊस; शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढणार

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

Latest Marathi News Live Update : जाचक अटी आणि ए ग्रेडच्या निकषामुळे शेतकऱ्यांना नाफेडला कांदा विकण्यात अडचणी

Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

SCROLL FOR NEXT