Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

Onion Price Crash Pushes Farmers into Financial Crisis : कांद्याला अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने देवळा तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी निधी उभारण्यासाठी सोने तारण ठेवत आहेत.
Why are Nashik farmers mortgaging gold?

Why are Nashik farmers mortgaging gold?

esakal

Updated on

-मोठाभाऊ पगार

देवळा (नाशिक) : कांद्यासह इतर शेतमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना बी-बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीसाठी आवश्यक असलेला पैसा उपलब्ध नसल्याने (Nashik onion farmers financial crisis) अनेक शेतकरी आता घरातील किडूकमिडूक सोन्याचे दागिने तारण ठेवून किंवा काही वेळा थेट मोडीत काढून भांडवल उभे करीत आहेत. त्यामुळे स्थानिक बँका आणि पतसंस्थांमध्ये सोनेतारणासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com