Gopal Hargobind Ved
Gopal Hargobind Ved esakal
जळगाव

Street Dog News : मोकाट कुत्र्यांनी घेतला व्यावसायिकांचा बळी!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात १२ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज एका व्यावसायिकाला कुत्र्यांमुळे जीव गमवावा लागल्याचे उघडकीस आले. यामुळे नागरिकांच्या जिवावर बेतल्याचे अनेक प्रसंग घडले आहेत. शहरातील एका व्यावसायिकाला मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. आतातरी महापालिका मोकाट कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार की नाही ? असा संतप्त प्रश्‍न नागरिक करीत आहेत. (Jalgaon Street dogs took victims of professionals)

येथील आदर्शनगरातील व्यावसायीक, राज इंटरप्राईजेसचे संचालक गोपाल हरगोविंद वेद (वय ६०) यांचे आज उपचारा दरम्यान निधन झाले. ते स्व.राकेश वेद, कल्पेश व देविदास वेद यांचे मोठे भाउ, करण वेद यांचे वडील होते. गोपाल वेद हे तीन महिन्यापूर्वी मित्राला डाबी हॉस्पिटलला सोडण्यासाठी मोटारसायकलने जात होते. अणूव्रत भवनाच्या गल्लीतील पाच सहा कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

यात गोपाल वेद यांच्या डोक्याला गंभीर दूखापत होवून ते कोमात गेले. त्यांच्या वाहनाला व मित्राला लागले नव्हते. वेद यांच्यावर नाशिकच्या ‘सीएनएस’ हास्पीटल, जळगावच्या डॉ.निलेश किनगे हॉस्पीटलमध्ये तीन महिन्यापासून उपचार सुरू होते. वेद यांच्यावर तीन महिने उपचार करूनही आज सकाळी पाचला निधन झाले.

तीन महिन्यात वेद यांच्यावर उपचारासाठी लाखो रुपये खर्चुनही जीव वाचविण्यात यश आले नाही. अशी नातेवाईकांची व्यथा आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याने एखाद्या व्यावसायिकाला जीव गमवावा लागतो, ही दुदैवाची घटना आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. (latest marathi news)

बालिका बचावली

दरवर्षी मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढतो. महापालिका या कुत्र्यांना एकतर पकडून दुसऱ्या प्रभागात नेवून सोडते. ती कुत्री तेथील नागरिकांना त्रास देतात. या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त महापालिका का करीत नाहीत. गेल्या आठवड्यात मोकाट कुत्र्यांनी शिवाजी नगरातील एका चार वर्षीय बालिकेला घरातून उचलून नेत लचके तोडले होते. नागरिकांच्या सतर्कतेने ती बालिका वाचली.

१२ शेळ्यांचा मृत्यू

दोन दिवसापूर्वी असोदा रोडवरील एका गोठ्या बांधलेल्या बारा शेळ्यांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करीत अकरा बकऱ्याचा बळी घेतला. अजून किती जणांवर कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर महापालिका मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार आहे, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Latest Marathi Live News Update: नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडून मतदान केंद्रांच्या सुरक्षेचा आढावा

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

SCROLL FOR NEXT