जळगाव

Jalgaon Accident : मद्यधुंद ट्रकचालकाने चिमुरडीला चिरडले; संतप्त नागरिकांचा चालकाला चोप

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident : देवगाव (ता. पारोळा) येथे मद्यधुंद वाहनचालकाने रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या सहा वर्षीय चिमुरडीला चिरडल्याची घटना शुक्रवारी (ता. ८) दुपारी तीनच्या सुमारास घडली. (Little girl died in truck accident jalgaon news)

देवगाव येथील पूजा अनिल भिल (वय ६) ही गावातील वसंत जिभाऊ नगर परिसरात रस्त्याच्या कडेला चालत असताना मागून देवगावफाट्याकडून देवगावकडे नीलेश संजय बेलदार (वय २४, रा. तमासावाडी, ता. पारोळा) याने त्याचा आयशर ट्रकने (एमएच ०४, एचएस ४७३१) चिमुरडीला चिरडले. नशेत भरधाव वेगाने पळवत असताना पूजाला जोरदार धडक बसल्याने ती गाडीखाली चिरडून गंभीररित्या जखमी झाली.

परिसरातील नागरिकांनी लगेच घटनास्थळी चालकाला ताब्यात घेतले व चिमुरडीला १०८ रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता वाटेतच तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संतप्त जमावाने दारू पिऊन वाहन चालवत असलेल्या वाहन चालकाला चोप दिला व वाहनाचेही तोडफोड करून नुकसान केले.

सहा वर्षीय चिमुकली ही जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिलीला शिक्षण घेत होती. याबाबत या अपघाताने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. याप्रकरणी चिमुकलीचे वडील अनिल भीमा भील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT