suicide
suicide  esakal
जळगाव

कोरोनात व्यवसाय गमावलेल्या गृहस्थाची आत्महत्त्या

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील सुप्रिम कॉलनीतील ४९ वर्षीय गृहस्थाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोरोना (Corona) काळातील लॉकडाउनमुळे (Lockdown) भरभराटीस आलेला कापड व्यवयाय बंद करावा लागल्याने या गृहस्थाने टोकाचे पाऊल उचलले. सुदाम नानाजी पाटील (वय ४९), असे मृताचे नाव नाव आहे.

कोरोनामुळे व्यवसायावर मोठा परिणाम

कुटुंबियांकडून प्राप्त माहितीनुसार, शहरातील सुप्रिम कॉलनीतील सुदाम पाटील दोन वर्षांपूर्वी यवतमाळ येथे स्थलांतरित झाले होते. कापड विक्री करून ते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होते. कोरोनामुळे त्यांचा व्यवसायावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जळगावात येऊन नवीन उद्योग सुरू करण्याच्या ते प्रयत्नात होते. त्यांनी घरही घेतले आणि केव्हाही आपला व्यवसाय नव्याने उभारण्याची ते तयारी करीत होते. सुदाम पाटील सध्या सुप्रिम कॉलनीत चुलतभाऊ संजय पाटील आणि देवीदास पाटील यांच्या घरी राहत होते. बुधवारी (ता. ३१) सुदाम पाटील यांनी राहत्या घरात गळफास घेऊन त जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. हा प्रकार त्यांचे चुलत भावांच्या लक्षात आल्याने त्यांनी दार उघडत त्यांना तातडीने खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मृताच्या पश्चात आई, पत्नी प्रतिभा, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT