truck 
जळगाव

थरार..गौण खनिज माफियांचा महसूल पथकावर हल्ला; कार नेऊन ठार मारण्याचा प्रयत्न 

राजू कवडीवाले

यावल (जळगाव) : अवैध गौण खनिज वाहतूकदाराने प्रांताधिकाऱ्यांवर डंपरखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी (ता. २८) रात्री किनगाव (ता. यावल) येथेही असाच प्रकार घडला. यात, अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपर व कारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकास ठार मारण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे अवैध वाळू वाहतूकदारांची दहशत वाढली असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रान निर्माण झाला आहे. दरम्यान, या घटनेबाबत येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
किनगाव येथे कार्यरत असलेले मंडळ अधिकारी सचिन जगताप, तलाठी टेमरसिंग बारेला, विलास नागरे, राजू घोरटे, गणेश वऱ्हाडे, विजय साळवे, निखील मिसाळ यांचे पथक रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास कर्तव्य बजावत असताना जळगावहून किनगावच्या दिशेने येणाऱ्या डंपरला (एमएच १२, एफझेड ८४२५) त्यांनी चौकशीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला. 

अन्‌ गावातच सुरू केली धक्‍काबुक्‍की
डंपरचालक वाहन न थांबवता वाहन किनगावात गेला. त्याचा पाठलाग केला असता हे डंपर गावातील मशिदीजवळ गर्दीच्या ठिकाणी थांबले. या वेळी डंपरचालकास नाव विचारले असता त्याने आपले नाव गणेश संजय कोळी (रा. कोळन्हावी, ता. यावल) असे सांगितले. याच वेळी त्या ठिकाणी टाटा इंडिका कार (एमएच १९, एपी ४१२८) आली. त्यामध्ये गोपाळ प्रल्हाद सोळुंखे, संदीप आधार सोळुंखे, छगन कोळी व गोपाळ कोळी हे बसलेले होते. यातील गोपाळ कोळी याने गाडीतून उतरून मंडळ अधिकारी जगताप यांच्याशी हुज्जत घालून तुम्हाला डंपर पकडण्याचा अधिकार नाही, असे बोलून वाद घातला. शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्याने मंडळ अधिकाऱ्यांना धक्काबुकी करून छातीवर बुक्का मारला. यानंतर ग्रामस्थांची वाढती संख्या पाहून कार घेऊन त्यांनी पळ काढला. त्यानंतर पंचनामा करून हे डंपर यावलकडे आणले जात असतानाही डंपरचालकाने साकळीजवळच्या भोनक नदीच्या दिशेने वाहन पळविण्याचा प्रयत्न केला. तर, कारचालक गोपाळ सोळुंखे याने पथकाच्या दिशेने वेगाने कार आणून अधिकाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. 
 
डंपर, कार जप्त 
याबाबत यावल पोलिसात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवैध गौण खनिज विनापरवाना वाहतूक करणारे डंपर व टाटा कार जप्त करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक अजमल पठाण व पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले तपास करीत आहेत. 

संपादन  ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

Latest Marathi News Updates : पंजाबच्या पुरग्रस्तांना वणीकरांचा मदतीचा हात

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

SCROLL FOR NEXT