bhusawal ordnance factory
bhusawal ordnance factory 
जळगाव

अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे कामगारांमध्ये संताप; खासगीकरणाविरोधात आयुध निर्माणीत निदर्शने

चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : केंद्र सरकारने देशातील मोठे प्रकल्प खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे. आज सादर अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात आली असून, या निषेधार्थ संपुर्ण देशात 10 प्रमुख केंद्रीय कर्मचारी महासंघाद्वारे व रेल्वे, संरक्षण, बिमा, इन्कम टैक्स, बैंक, टपाल, अन्य केंद्रीय कर्मचारि-याच्या महासंघाद्वारे स्थापित एनजेसीए ( नॅशनल जॉईंट कॉन्सील फॉर एक्शन) द्वारा देशव्यापी 1 दिवसीय "कॉल अटेन्शन डे" आज (ता. 1) पाळण्यात आला.

देशाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात मोठे प्रकल्प खाजगीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आयुध निर्माणी कर्मचार्यांतर्फे या निषेधार्थ कॉल अटेन्शन दिवस पाळण्यात आला. यात प्रमुख मागणी देशातील रेल्वे, संरक्षण आदिंचे सरकार द्वारा निगमिकरण करण्याचे प्रस्ताव रद्द करणे, सरकार द्वारा डिए फ्रिज वापस घेणे, जानेवारी 2004 पासुन लागू नवी पेन्शन रद्द करणे, 7 वे वेतन आयोगातील आणि लागु करणे, संरक्षण विभागात 100 टक्के अनुकंपा भर्ती करने, रिक्त जागा भरणे, अन्य 13 सुत्री मागण्या करण्यात आल्या.

सरकार विरूद्ध जोरदार घोषणाबाजी
सर्व कर्मचारी आयुध निर्माणी मुख्य प्रवेशद्वारावर सकाळी जमुन सरकार विरूद्ध जोरदार घोषणाबाजी व निदर्शने केली. संरक्षणचे निगमिकरण प्रस्ताव रद्द करण्यासाठी सरकार चे लक्ष वेधले. संरक्षण मध्ये कार्यरत एआयडीईएफ, आयएनडीडब्ल्यूएफ, बीपीएम एस चे संयुक्त राष्ट्रीय समिती चे आदेशा नुसार स्थानिक संयुक्त समिती द्वारे हा कार्यक्रम झाला. सर्व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली. दिपक भिडे, किशोर सुर्यवंशी, किशोर चौधरी यांनी संबोधित केले. किशोर पाटील, प्रविण मोरे, अनिल सोनवणे, कैलास राजपुत, एम एस राऊत, एन डि पाटिल, विजय साळुंखे, सूर्यभान गाढे, एम डि वानखेडे सह संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते दिनेश राजगिरे संयोजक स्थानिक संघर्ष समिति यांचे मार्गदर्शन लाभले.  

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT