group farming
group farming 
जळगाव

खरबूजची लागवड परवडली; बांधावर किलोला तीस रूपये दर, सौदी अरेबियाला निर्यात

दीपक कच्छवा

मेहुणबारे (जळगाव) : शेती परवडत नाही अशी ओरड न करत बसता नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून गटशेती माध्यमातून आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न लोंढे (ता.चाळीसगाव) येथील शेतकऱ्यांने केला आहे. पिकेल ते विकेल या अंतर्गत पिकवलेले खरबूज थेट सौदी अरेबिया येथे एक्स्पोर्ट केला जात आहे. सुमारे 3 एकर जागेवर खरबूजाची लागवड केली होती. जागेवरच किलोला 30 रूपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीला फळ आले आहे. शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत लोंढे (ता. चाळीसगाव) येथे शिव समर्थ शेतकरी गटाची स्थापना शिवाजी निकम यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी गटाची स्थापन करण्यात आली. सदर गटाने विकेल ते पिकेल संत शिरोमणी सावता माळी अभियान यामध्ये सहभाग घेतला. सदर गटामार्फत (कुंदन) जातीचे खरबूज लागवड सुमारे 3 एकर क्षेत्रावर करण्यात आली. हे खरबूज आता बहरात आले असून 30 रुपये प्रति किलोने जागेवर भाव मिळत आहे. स्थानिक बाजारपेठेबरोबरच हे दर्जेदार खरबूज थेट आखातात म्हणजे सौदी अरेबिया येथे एक्स्पोर्ट केला जात आहे. त्यातून शेतकऱ्यांना चांगला अर्थलाभ होईल. जवळपास 15 टन खरबुज माल निघण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पाची तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी सूर्यवंशी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्माचे ज्ञानेश्वर पवार यांनी पाहणी करून शेतकऱ्यांचे कौतुक केले.

अन्य भाजीपाल्‍याचीही लागवड
या शेतकरी गटाने इथेच न थांबता भाजीपाला लागवडही केली आहे. त्यात टोमॅटो 10 टन 15 रुपये प्रति किलो, चवळी 9 टन 25 रुपये प्रति किलो विक्री चालू आहे. त्यातून अर्थकरण साधले आहे. एकत्रित गट शेतीचा हा प्रयोग लोंढे येथे चांगलाच यशस्वी झाला आहे. विकेल ते पिकेल या प्रकल्पास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी संचालक अनिल भोकरे, उपसंचालक आत्मा-2 चे मधुकर चौधरी, कुर्बान तडवी यांचे मोलाचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती या शेतकऱ्यांनी दिली.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT