soldier dead
soldier dead 
जळगाव

चाळीसगाव तालुक्‍यातील जवानाचा मणिपूरमध्ये गोळी लागून मृत्यू 

दीपक कच्छवा

मेहुणबारे (जळगाव) : तांबोळे बुद्रुक (ता. चाळीसगाव) येथील सागर रामा धनगर (वय २३) या जवानाचा मणिपूर येथे गोळी लागून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. ३१) घडली. या घटनेमुळे तांबोळे गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. 
सागर धनगर हे २०१७ मध्ये ५ मराठा इन्फंट्री बटालियनमध्ये सैन्यदलात भरती झाले होते. बेळगाव (कर्नाटक) येथून एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची नियुक्ती दिल्ली येथे झाली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांची बदली मणिपूर राज्यात करण्यात आली होती. जवान सागर धनगर हे सेनापती (मणिपूर) येथे रात्री कर्तव्यावर असताना १२ वाजून २० मिनिटांनी फायरिंग झाली. यात त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाचे जनसैनिक कार्यालय, जळगाव येथील अधिकारी अनिरुद्ध वाकडे यांनी दिली. सागर यांच्या पश्चात आई व मोठा भाऊ आहे. सागर हे लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यांच्या आईने मोलमजुरी करून मुलांचे संगोपन केले होते. 
 
मंगळवारी पार्थिव गावी पोचणार 
सागर धनगर हे नोव्हेंबर २०१७ मध्ये ५, मराठा इन्फ्रंटी बटालियनमध्ये रुजू झाले होते. सागर यांचे पार्थिव सोमवारी (ता. १) दुपारी सव्वादोनला इम्फाळ (मणिपूर) येथून गुवाहाटी(आसाम) येथे आणण्यात येणार आहे. तेथून ते दुपारी साडेतीनला मुंबई येथील विमानतळावर सांयकाळी सव्वासातला पोचेल व त्यांनतर ते शक्यतो मंगळवारी (ता. २) त्यांच्या मूळगावी आणण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT