jalgaon news corona dead body
jalgaon news corona dead body 
जळगाव

मृत्युनंतरही मिळेना आसरा; कुटूंबीयांवर ओढवला बाका प्रसंग 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जळगाव शहरात जिल्‍हा न्यायालय जवळील एका खासगी रुग्णालयात काल संध्याकाळी कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यु झाला. मृतदेह लवकर घेवून जा, म्हणुन रुग्णालयाचा तगादा, तर रात्रभर मृतदेह ठेवण्यास जिल्‍हारुग्णालयाचा नकार, रात्री आठ नंतर अंत्यवीधी बंद असल्याने तेथेही नेतायेईना अशा बिकट प्रसंगातून सध्या कोरोना बाधीत रुग्णांच्या कुटूंबीयांना जावे लागत आहे. 

जळगाव शहर आणि जिल्‍ह्‍यात कोरोना बाधीतांसह कुटूंबीयांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. उपचारासाठी धावपळ, रुग्णासाठी ऑक्सीजन बेड, व्‍हेंटीलेटरसाठी मरमर करुन उपचार सुरु करायचे उपचारा दरम्यान मृत्यु झाल्यावर अधीकच त्रास होऊ लागला आहे. 

बिल भरले अन्‌ मृतदेह नेण्याची सुचना
शहरातील एका लॉज आणि खानावळ चालकाच्या नातेवाईकाचा कोरोनाने मृत्यु झाल्याची घटना घडली. जिल्हा न्यायालया शेजारील हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मृत्युनंतर कुटूंबीयांनी रुग्णालयाचे बील रोखीने अदा केल्यावर रुग्णालय प्रशासनाने मृतदेह तातडीने घेवून जाण्याची सुचना कुटूंबीयांना केली. 

स्‍मशानभुमीत नाही की शवविच्छेदन गृहातही नकार
रात्री आठनंतर अंत्यसंस्काराला बंदी घालण्यात आल्याने स्मशानभुमीची दारे बंद होती. तेथील कर्मचाऱ्यांनी नकार दिला. कुंटूंबीयांनी तत्काळ जिल्‍हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात संपर्क केला. मात्र, तेथूनही नकारच ऐकायला आला. रात्री अम्ही मृतदेह घेणार नाही असे उत्तर मिळाल्यावर संबधीतांनी जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांना संपर्क करुन माहिती दिल्यावर त्याच रुग्णालयात मृतदेह रात्रभर ठेवण्यात आला. कोरोना बाधीताचा मृत्यु ओढवूनही त्याला तत्काळ कोरोना प्रतिबंधक किटमध्ये पॅक करणे बंधनकारक असतांना तसे न करता रात्रभर मृतदेह पडून असल्याचे समोर आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT