Corona vaccination
Corona vaccination 
जळगाव

गंभीर स्‍थिती..जिल्हयातील कोरोना लसीकरण थांबले 

देवीदास वाणी

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना लसीकरण वेगात सुरू होते. आज मात्र शहरातील सर्वच लसीकरण केंद्रे बंद होती. ग्रामीण भागातील काही लसीकरण केंद्रावर लस असल्याने ती सुरू होती. लसीकरण बंद झाल्याने नागरिकांच्या लसीकरणाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आगामी दोन दिवसात लसीकरण केंद्र लसीच्या तुटवड्यामुळे बंद राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 

जिल्ह्यात आजअखेर कोवीशिल्ड लसींच २ लाख ४ हजार ३४० डोस आले होते. त्यातील १ लाख ९५ हजार ५४० डोस वापरले गेले. ८ हजार ८०० डोस गेल्या देान दिवसात ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर पाठविण्यात आले आहेत. तर कोव्हॅक्सीन लसींचे १८ हजार डोस आले आहेत. तेही वापरले गेले. आता ३ हजार ६८० को व्हॅक्सीन लसींचे डोस आले आहेत. ज्यांनी अगोदर को-व्हॅक्सीन लस अगोदर घेतली गेले त्यांनाच ते दिले जातील. 

डोस उपलब्‍ध झाल्‍यानंतर पुन्हा सुरवात
कोवीशिल्ड लसीचे डोस संपल्याने शहरातील रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शिवाजी नगर रुग्णालय व खासगी ठिकाणी सुरू असलेले लसीकरण आज बंद होते. जेव्हा लसींचे डोस उपलब्ध होतील तेव्हा लसीकरण पुन्हा सुरू होईल. शासनाकडे आपण १ लाख ३० हजार लसींची मागणी केली आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी.जमादार यांनी दिली. 
 
कोरोना थांबणार कसा 
एकीकडे कोरोनावर लसीकरण हाच बेस्ट उपाय आहे. त्यासाठी शासन ४५ वर्षावरील सर्वांना लसीकरण सक्तीचे करीत आहे. दुसरीकडे केंद्राकडून राज्यांना लसींचा पुरवठा होत नाही. लसीकरणा नंतर तब्बल ६० दिवसांनी कोरोनाशी लढायला अॅन्टीबॉडीज तयार होतात. जेवढया जास्त नागरिकांचे लसीकरण लवकर होतील त्यानंतरच्या कालावधीत ॲन्टीबॉडीज तयार होतील. यामुळे लसीकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची जबाबदारी आरेाग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनावर आहे. लसी उपलब्ध नसतील तर कोरोनाला प्रतिबंध कसा घालणार ? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

संपादन- राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT