remdesivir
remdesivir 
जळगाव

रेमडेसिव्हिरचा बाह्यरुग्णासाठी वापर करणे भोवले; चार डॉक्टरांना नोटिसा 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : रेमडेसिव्हिरचा वापर बाह्यरुग्णांसाठी वापर केल्याप्रकरणी चार खासगी डॉक्टरांना नोटिसा देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा तुटवडा आहे. खासगी डॉक्टर रुग्णांना रेमडेसिव्हिर आणण्यास सांगतात. उपलब्ध रेमडेसिव्हिर गरजू रुग्णांना न देता इतर बाह्यरुग्णांना देतात. यामुळे रेमडेसिव्हिरचा तुटवडा जाणवत आहे. 
रेमडेसिव्हिरचा तुटवडा असताना बाह्यरुग्णांना हे इंजेक्शन दिले. यामुळे संबंधित डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. रेमडेसिव्हिरचा तुटवडा राज्‍यात जाणवत आहे. अत्‍यवस्‍थ रूग्‍णांना देखील वेळेवर इंजेक्‍शन उपलब्‍ध होत नसल्‍याने रूग्‍णांच्या नातेवाईकांचा नाईलाज होत आहे. याबाबत कडक नियम लागू झाल्‍यानंतर देखील डॉक्‍टरांनी बाह्यरूग्‍णांना इंजेक्‍शन दिले. असा प्रकार लक्षात आल्‍याने चार डॉक्‍टरांना नोटीस देण्यात आली.

नोटीस दिलेले डॉक्टर असे  
डॉ. जहीद शहा (शहा हॉस्पिटल) एरंडोल 
डॉ. सचिन भडांगे (सिद्धिविनायक) (पहूर) 
डॉ. निखिल बोरा (विघ्नहर्ता हॉस्पिटल) (कजगाव, ता. भडगाव) 
डॉ. तौसिफ खान (मुस्कान हॉस्पिटल) (भुसावळ) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT