corona
corona 
जळगाव

जळगाव जिल्‍ह्‍यात तिनशे क्रॉस; जळगावातील सर्वाधिक रूग्‍ण

सकाळवृत्तसेवा

जळगाव : कोरोनाचा वाढत संसर्ग पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करत आहे. तीन दिवसांपासून आकडा सातत्‍याने वाढत असून आज म्‍हणजेच मागील चोवीस तासांत जिल्‍ह्‍यात तब्बल ३१९ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरातील सर्वाधिक १५८ तर चाळीसगावातील ७१ रूग्णांचा समावेश आहे.
मागील काही महिन्यांमध्ये जळगाव जिल्‍ह्‍यातील कोरोना रूग्‍णांचा वेग मंदावलेला होता. परंतु, मागील आठवडाभरापासून यात सातत्‍याने वाढत असून, रोजचा वाढणारा आकडा हा जिल्‍ह्‍यासाठी धोक्‍याची घंटा वाजवत आहे. मार्केट, सार्वजनिक कार्यक्रम तसेच लग्‍न समारंभात होणारी गर्दी यास कारणीभुत ठरत आहे. रूग्‍ण वाढत असले तरी देखील नागरीकांमध्ये याचे गांभीर्य पाहण्यास मिळत नसून, अगदी बिनधास्‍तपणे विना मास्‍क गर्दी करत आहेत. यामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होवू लागला आहे.

चार जणांचा मृत्‍यू
जिल्‍हा प्रशासनाच्यावतीने पाठविण्यात आलेल्‍या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आज ३१९ रूग्‍ण आढळून आले आहेत. यामुळे एकुण बाधितांची संख्या ही ५८ हजार ८५४ हजारावर पोहचली आहे. त्यापैकी ५६ हजार १७८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. मुख्य म्‍हणजे काही महिन्यात मृतांचा रोज येणारा आकडा हा एक किंवा दोन होता. मात्र आज जळगाव आणि चाळीसगाव प्रत्येक एक आणि भुसावळ शहरातील दोन अशा चार रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर- १५८, जळगाव ग्रामीण ६, भुसावळ १२, अमळनेर २०, चोपडा १८, पाचोरा ४, भडगाव ७, धरणगाव ४, यावल ४, एरंडोल ०, जामनेर ४, रावेर ०, पारोळा १, चाळीसगाव ७१, मुक्ताईनगर ७, बोदवड ० आणि इतर जिल्ह्यात ३ असे एकुण ३१९ रूग्ण आढळून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT