fertilizer prices
fertilizer prices fertilizer prices
जळगाव

खतांच्या दरवाढीमुळे आर्थिक गणित कोलमडणार

सकाळ डिजिटल टीम

सावदा (जळगाव) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी (Farmer) मृगबाग केळी व खरीप हंगामातील पिके लागवडीसाठी मशागतीची कामे सुरू जोमात सुरू केली आहे. केळी (Banana) पिकासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, पूर्वसूचना न देता यावर्षी सरकारने रासायनिक खतांचे भाव (Chemical fertilizer prices) वाढविल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. (economic will collapse farmers due to the rise in fertilizer prices)

गतवर्षी लॉकडाउनमुळे केळीसह अन्य पिकांना बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. त्यात पीककर्जासाठी अर्ज करूनही अनेक शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर झाले नाही. खतांच्या किमतीसोबतच तणनाशक, कीटकनाशक यांच्या भावातही वाढ झाली आहे. एकूणच उत्पादन खर्च वाढणार आहे आणि शेतमालाचे भाव या तुलनेने कमी वाढत आहे. शिवाय, नैसर्गिक संकटाचा फटका पिकांना बसत असतो. येणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसवताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.

शेतकऱ्याला बोजा न परवडणारा

खतांच्या किमतीत सरासरी १५ ते १७ टक्के वाढ झाली असून, याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. यावर्षी शेतकऱ्यांवर खतांच्या वाढीव किमतीचा बोजा न परवडणारा आहे. इंधन दरवाढ झाल्याने शेतीची मशागत करणे देखील शेतकऱ्याला न परवडणारे आहे. आधीच ट्रॅक्टरमालकांनी एकरी नांगरणी २०० रुपयाने भाववाढ केली आहे. सद्य:स्थितीत शेतकऱ्यास कोणीही उधार देत नाही. यामुळे कर्ज घेणे नसता सावकाराकडे हात पसरविणे याशिवाय खत व बियाणे खरेदी होऊ शकत नाही. अशा सर्व परिस्थितीचा शासनाने विचार करावा व खतांच्या किमतीची वाढ स्थगित करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

..तर शंभर कोटींचा फटका

रासायनिक खतांची भाववाढ कायम राहिल्यास जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंदाजे १०० कोटींचा फटका बसणार आहे. जिल्ह्यात साडेपाच लाख मेट्रिक टन खतांचा वापर वर्षभरात केला जातो. सरासरी १७ ते १८ टक्के खतांमध्ये भाववाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

येथील लोकप्रतिनिधींनी खतांच्या दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे. खतांची वाढलेले दर कमी करण्यास ते सरकारला भाग पाडतील, अशी शेतकरी आशा बाळगून आहेत.

- कमलाकर पाटील, केळी उत्पादक शेतकरी, कोचूर

खर्च वाढल्यामुळे याचा थेट उत्पादनावर परिणाम होणार आहे. शासन शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे की लूट समजायला मार्ग नाही. रासायनिक खतांच्या किमतीत कोणतीही दरवाढ होणार नाही, असे केंद्रिय कृषी मंत्री सांगत होते. मग दरवाढ झाली कशी?

- नीलेश भारंबे, शेतकरी, रोझोदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT