government servant society jalgaon
government servant society jalgaon government servant society jalgaon
जळगाव

अ‘सहकार’ करणाऱ्या गद्दारांना धडा शिकवू : सहकार गटनेते उदय पाटील

सकाळ डिजिटल टीम

चोपडा (जळगाव) : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स. सोसायटी)मध्ये पंचवार्षिक कालावधीत शेवटच्या वर्षी सहकार गटात खिंडार पडले. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सत्ताधारी सहकार गटात उभी फूट पडली होती. नाराजीनाट्यावरून सत्तापरिवर्तन झाले. अकरा संचालकांनी स्वतंत्र गट स्थापून ग.स.वर सत्ता काबीज केली. मात्र, आता येणाऱ्या निवडणुकीत या गद्दारांना सभासद धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत. या गद्दारांना परत सहकार गटातून तिकीट दिले जाणार नसल्याचे सहकार गटाचे अध्यक्ष तथा गटनेते उदय पाटील यांनी ‘सकाळ’ला बोलताना सांगितले. (government-servant-society-election-meet-chopda)

आगामी ग.स. निवडणुकीसंदर्भात येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शनिवारी (ता. १९) सहकार गटाची सभासदांसोबत सहविचार सभा झाली. त्या वेळी त्यांनी माहिती दिली. यावेळी माजी उपाध्यक्ष अजबराव पाटील, सहकार नेते व्ही. झेड. पाटील, माजी ग. स. संचालक रमेश शिंदे, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष आर. एच. बाविस्कर, निवृत्त शिक्षक रमेश भोईटे, जळगाव माध्यमिक शिक्षक पतपेढी संचालक आर. एल. बाविस्कर, चोपडा माध्यमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष विकास शिर्के, ग.स. सोसायटी संचालक देवेंद्र पाटील, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष नंदकिशोर सोनवणे, संचालक राजू माळी आदी उपस्थित होते.

उदय पाटील म्हणाले, की पंचवीस वर्षांच्या कालखंडात बरेच बदल झाले, सोयीचा फायदा घेत गेले. अन्याय झाला तरी पण एकनिष्ठ राहिलो. निवडणूक आली की पहिल्या बाकावर, संपली की शेवटच्या बाकावर असे का होते ते कळत नाही. ज्याचे चांगले काम असेल त्याला कधीही भीती नसते. २००६-०७ मध्ये जामीनकी कर्जाचे ९ टक्के, तर विशेष कर्जाचे ११ टक्के व्याजदर होते. राष्ट्रीयीकृत बँकांचेही व्याजदर कमी आहेत. येत्या कालखंडात कर्जावरील व्याजदर कमी करणे हाच मूळ उद्देश आहे.

गद्दारांना तिकीट द्यायचे का?

सहविचार सभेत सहकार गटातून बाहेर पडलेल्या ११ संचालकांना पुन्हा तिकीट द्यायचे का, असा प्रश्न सभेतील उपस्थित सभासदांना केला असता तुम्ही तिकीट दिले तरी त्यांना गाडणार. ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांना कोणत्याही गटातून उमेदवारी मिळायला नको, असे सभासदांनी ठणकावून सांगितले. तालुकानिहाय दौऱ्यांमध्ये हा प्रश्न सभासदांपुढे मांडला जाणार आहे.

तालुक्यास दोन संचालक

सहविचार सभेत सहकार गटनेते व्ही. झेड. पाटील म्हणाले, की चूक तुमची नाही, आमची काही. मंडळी गद्दार आहे. तालुक्यास दोन संचालक देऊन मंगेश भोईटे यांच्या रूपाने दुसरा संचालक देण्याचा विचार केला जाईल, असे सांगितले. आगामी निवडणुकीत ग.स.मध्ये दोन संचालक देताना मंगेश भोईटे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. सहविचार सभेत मुख्याध्यापक एन. एस. सोनवणे, विलास पाटील, माजी संचालक रमेश शिंदे, शिक्षकेतर संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास माळी यांनी मनोगत व्यक्त केले. राधेश्याम पाटील यांनी सूत्रसंचलन केले. या वेळी मंगेश भोईटे, महेंद्र बोरसे, अशोक साळुंखे, प्रा. रमाकांत धनगर, संजीव शेटे, अनिल सोनवणे, नितीन सोनवणे, भूपेंद्र पाटील, भालचंद्र पवार आदी उपस्थित होते.

लोकमान्य, सहकार एकत्र?

आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, निष्ठावंत व प्रामाणिक सहकाऱ्यांची चाचपणी करू. यात (स्व.) ह.मा. आप्पांच्या एकनिष्ठ असलेल्यांचाही विचार करणार असल्याचे गटनेते उदय पाटील यांनी सांगितले असल्याने लोकमान्य व सहकार गट एकत्र निवडणूक लढणार असल्याचे सूतोवाच दिसून येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT