holi utsav
holi utsav 
जळगाव

मुस्लिम कुटुंब वाढवताय होळीचा गोडवा 

देवीदास वाणी

जळगाव : होळी, रंगपंचमी म्हणजे एकमेकांतील भेदभाव विसरून एकत्र येत रंगांची उधळण करण्याचा उत्सव. मात्र यंदा कोरोनामुळे होळी व रंगपंचमीवर कोरोनाचे सावट आहे, असे असले तरी पंचवीस वर्षांपासून अमळनेर येथील मुस्लिम कुटुंबीय हिंदू बांधवांना सोबत घेऊन होळी, गुढीपाडव्यासाठी लागणारे हार- कडे तयार करीत आहे. मुस्लिम- हिंदू बांधव एकत्र येत होळीचा गोडवा वाढवत आहेत. 
आज होळी अन्‌ होळीला सारखेचा हार घातला जातो. लहान मुलींना साखरेचा हार, तर मुलांना कडे दिले जाते. गुढीपाडव्याला गुढीला सारखेचा हार-कडे घातले जाते. हार-कड्यांचा दर शंभर रुपये किलो आहे. 
अमळनेर येथील अजिज करीम हलवाई राष्ट्रीय एकात्मता जोपासत आहेत. हार-कडे बनविण्याचा त्याचा छोटा व्यवसाय हिंदू- मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक आहे. अमळनेर येथील हा परिवार पाच पिढ्यांपासून मिठाई व्यवसायात आहे. अजिज भाई यांच्या पणजोबापासून हा व्यवसाय सुरू आहे. 

महिनाभरासाठी उभारतात कारखाना
व्यवसायाची परंपरा त्यांचे आजोबा अमीरभाई यांनी जोपासत त्यापाठोपाठ वडील करीमभाई यांनी व्यवसायात प्रगती साधली. अजिजभाई यांना त्यांची दोन मुले नासीर व आदिल मदत करतात. नातू अझहरही मदत करीत आहे. अजिज हलवाईवाले २५ वर्षांपासून येथील कासामवाडीत न्यू मिलन हार कंगण नावाने कारखाना महिनाभरासाठी जळगावमध्ये उभारतात. एका महिन्यात हजार किलोचा माल येथे तयार होतो. तो माल इतर व्यापारी नेऊन त्याची विक्री करतात. 

हिंदू-मुस्लिम कारागीर एकत्र काम करतात 
अजिजभाई याच्या छोट्याशा व्यवसायात हिंदू, मुस्लिम, आदिवासी मजूरही काम करतात. त्यात राम भिल, संजय भिल, दिलबर भिल, निसार पैलवान, मजीद करीम, साजीद मजीद, साबीर मजीद आदींचा समावेश आहे. ही मंडळी जातीय भेद न पाळता एकत्र काम करतात ‘मजहब नही सिखाता..आपस मे बैर रखना...हिंदी है हम, हिंदी है हम...’ या उक्तीप्रमाणे एकोप्याने राहतात. 

संपादन – राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT