mahavitaran mla mangesh chavan
mahavitaran mla mangesh chavan 
जळगाव

भाजप आमदाराने महावितरणच्या अधिकाऱ्यास बांधले खुर्चीला

सकाळवृत्तसेवा

जळगाव : तक्रारी करून देखील वीज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करत नाही. यामुळे संतप्त झालेल्या आमदार मंगेश चव्हाण यांनी अधिकाऱ्याला चक्क खुर्चीला बांधल्याने खळबळ उडाली आहे.
चाळीसगाव मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्यांचे निराकरण व्हावे; म्हणून आज वीज वितरणच्या मुख्य कार्यालयात धडक दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर त्‍यांनी आपली आक्रमक भुमिका मांडताना अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांच्यासोबत असलेल्‍या शेतकऱ्यांनी देखील आपल्या समस्या मांडल्या. मात्र अधिकाऱ्यांनी आपण कार्यवाही करत असल्याचे उत्तर दिले. 

अधीक्षक अभियंत्‍यास‌ दोरीने बांधले
चाळीसगाव तालुक्यातून महावितरणने सात हजार वीज कनेक्शन तोडण्यात आल्याबद्दलही त्यांनी जाब विचारला. यामुळे संतप्त झाले होते. महावितरणचे अधीक्षक अभियंता फारूक शेख यांच्याकडे आमदार चव्हाण यांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडले. शेख आणि आमदार यांच्यात काही वेळ शाब्‍दीक बोलाबाली झाली. मात्र संतप्त झालेल्‍या आमदार मंगेश चव्हाण यांनी दोरी घेवून चक्क अधीक्षक अभियंता शेख यांना खुर्चीला बांधले. यानंतर त्यांना चपलांचा हार घालण्याची तयारी देखील करण्यात आली. यामुळे खळबळ उडाली असून वीज वितरण कंपनीच्या आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यालयास ठोकले कुलूप
चाळीसगाव तालुक्यातील सात हजार लोकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले असून शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या सोडविण्यात आल्‍या नाही. यामुळे संतप्त भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी वीज वितरण कंपनीच्या जळगाव सर्कल ऑफिसमध्ये धडक देत प्रश्‍न मांडले. त्यांनी अधिक्षक अभियंत्‍यास खुर्चीला बांधून बाहेर आणले. इतकेच नाही तर त्‍यांनी महावितरणच्या कार्यालयास कुलूप ठोकले. पोलीस उपस्थित झाले असता ते स्वत:हून गाडीत बसले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT