eknath khadse devendra fadnavis
eknath khadse devendra fadnavis eknath khadse devendra fadnavis
जळगाव

फडणवीसांचा अभ्‍यास कच्चा; भविष्‍यवाणी केली आता वाट पाहू : एकनाथ खडसे

राजेश सोनवणे

जळगाव : महाराष्ट्रावर ज्यावेळी संकट येते त्यावेळी सत्ताधारी विरोधी पक्ष हातात हात घालून संकटाशी सामना करतात. हिच आपली परंपरा आहे. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कुत्र्या- मांजराचा खेळ करत आहेत, तो त्यांनी खेळू नये. तसेच ते एक चांगले भविष्‍यकार असून, त्‍यांनी केलेल्‍या भविष्‍यवाणी खरी ठरते की खोटी याची प्रतिक्षा करूया, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलतर्फे जळगाव येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कोरोना काळात विरोधी पक्ष घेत असलेल्या भूमिकेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, की या महाराष्ट्राची परंपरा आहे; ज्या वेळी राज्यावर संकट आले त्यावेळी सर्वांनी एकत्र येवून काम केले आहे. जसा किल्लारीचा भूकंप, मुंबईतील बॉम्बस्फोट अशा अनेक घटनांच्या वेळेस राजकारण बाजूला ठेऊन सत्ताधारी, विरोधी पक्ष यांनी हातात हात घालून संकटाशी सामना केला. त्या कालखंडात मी विरोधी पक्ष नेता होतो. मात्र अशा संकट समयी आम्ही असा कुत्र्या मांजराचा खेळ कधी खेळला नाही. फडणवीस सद्या जे करतायेत ते एका विरोधी पक्ष नेत्यांकडून अपेक्षित नाही.

आता २ तारखेची प्रतीक्षा

राज्‍याचे विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस हे चांगले भविष्यकार आहेत. आता त्यांनी पुन्हा सरकार पडण्याची २ मे ही तारीख दिली आहे. त्यामुळे आपण त्याची प्रतीक्षा करीत आहोत. जर या वेळीही सरकार पडले नाही तर फडणवीस यांचा भविष्याचा अभ्यास कच्चा आहे असे आपण जाहीर करणार आहोत.

केंद्राच्या निर्यातीमुळेच रेमडिसीव्हिरचा तुटवडा

राज्यातील कोरोना संदर्भात राज्य सरकार करीत असलेल्या उपाय योजना बाबत ते म्हणाले की, राज्य सरकार आपल्या परीने प्रयत्न करत आहे. परंतु त्यांना काही मर्यादा आहेत. राज्यात रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. केंद्र सरकारने जर निर्यात केली नसती तर हा प्रसंग आज निर्माण झाला नसता. अशा कठीण प्रसंगी केंद्राने राज्याला मदत करायला पाहिजे, जी निर्यात बंदी आता केली आहे ती अगोदरच करायला पाहिजे होती. आता निर्यात बंदी केली आहे त्यामुळे इंजेक्शनचा साठा उपलब्ध होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT