server problem
server problem 
जळगाव

ऑनलाइन उताऱ्यांना सर्व्हरची बाधा 

आनन शिंपी

चाळीसगाव (जळगाव) : शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रशासनाकडून दिले जाणारे ऑनलाइन उतारे सर्व्हरच्या तांत्रिक दोषामुळे देता येत नसल्याने हे उतारे देणारे तलाठी व मंडळाधिकारी त्रस्त झाले आहेत. ऑनलाइन प्रक्रियेत सातत्याने निर्माण होणाऱ्या बिघाडमुळे बऱ्याचदा शेतकरी व नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. ऑनलाइन उताऱ्यांना सर्व्हरची बाधा लागल्याने त्रस्त झालेल्या तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील तहसीलदारांची डिजीटल सिग्नेचर तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे जमा केली. या प्रक्रियेत सुरळीतपणा येईपर्यंत आम्ही ऑनलाइन उतारे देणार नाहीत, असा पवित्रा तलाठ्यांनी घेतला आहे. 
ऑनलाइन सातबारा उतारा देणारी महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांसह तलाठ्यांचाही वेळ वाचला आहे. मात्र, ऑनलाइन उतारे देताना येणाऱ्या अनेक अडचणी तलाठींसाठी डोकेदुखी ठरत आहेत. संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीद्वारे साताबारा उतारा शेतकऱ्यांना तत्काळ दिले जाणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात गेल्या काही दिवसांपासून ही सुविधा सुरळीत सुरू नसल्याने तलाठ्यांना अडचणी येत आहेत. ऑनलाइन सर्व्हरच्या बिघाडामुळे शेतकऱ्यांच्या रोषाला नेहमीच सामोरे जावे लागते. या प्रकारामुळे तळाठी व मंडळाधिकाऱ्यांनी ऑनलाईन सातबारा देणाऱ्या योजनेवर बहिस्कार टाकत ऑनलाईन उतारे देण्यासाठी आवश्‍यक असलेल्या डिजिटल सिग्नेचर तहसीलदार अमोर मोरे यांच्याकडे जमा करून रोष व्यक्त केला. 

यापूर्वीही तक्रार 
ऑनलाइन उतारे देण्याची योजना सुरू झाल्यापासूनच अडचणी येत आहेत. ही अडचण तांत्रिक असल्यामुळे ती दूर करणे अशक्य असते. नागरिक मात्र तलाठींनाच दोष देतात. त्यामुळे यापूर्वी देखील तलाठींनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यानंतर ऑनलाइन उतारे देण्याच्या प्रक्रियेत कुठलीही सुधारणा झाली नसल्याचे तलाठ्यांनी सांगितले. दरम्यान, उतारे मिळत नसल्याने जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. या संदर्भात तालुक्यातील तलाठींनी तहसीलदारांना निवेदन देऊन या प्रक्रियेत सुसूत्रता आणावी, अशी विनंती केली आहे. निवेदन देतेवेळी तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश येडे, सचिव सुनील पवार, मंडळाधिकारी एस. पी. बच्छाव, टी. बी. पाटील, वृषाली सोनवणे आदी उपस्थित होते. 

तलाठींचे निवेदन मिळाले असून, सध्या ऑफलाइन उतारे देता येणार नाहीत, सर्व्हरमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साधारणतः सोमवारपर्यंत ही प्रक्रिया सुरळीत होईल. 
- अमोल मोरे, तहसीलदार, चाळीसगाव 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT