fetus ruptured in the abdomen
fetus ruptured in the abdomen 
जळगाव

गर्भच पोटात फुटल्‍याने प्रकृती खालावली; पोटात साचले होते रक्‍त पण सुदैवाने वाचली

सकाळवृत्तसेवा

जळगाव : पहूर येथील गर्भवती असलेल्‍या २४ वर्षीय महिलेच्या पोटात गर्भाशयाच्या नलिकेत गर्भ राहिला होता. मात्र गर्भ अचानक फुटल्‍याने महिलेची प्रकृती खालावली होती. यानंतर सदर महिलेला शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार झाल्‍याने तिचे प्राण वाचले.
पहुर (ता. जामनेर) येथील २४ वर्षीय महिला तिसऱ्यांदा गर्भवती राहिली. सदर महिलेला दोन मुले आहेत. पोटात गर्भ राहिल्‍यानंतर गेल्‍या अनेक दिवसांपासून तिच्या पोटात दुखत होते. मात्र दुखण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु, अधिक त्रास जाणवू लागल्‍याने पहुन आणि जामनेर येथील रूग्‍णालयात नेले असता तेथे उपचार होवू शकले नाही. यामुळे तिला तात्‍काळ शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

सोनोग्राफीत काहीही दिसेना
गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्‍याने तिची सोनोग्राफी करण्यात आली. मात्र सोनोग्राफीमध्ये काहीही दिसून येत नव्हते. मात्र शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केल्‍यानंतर स्‍त्रीरोग तज्ञ डॉ. संजय बनसोडे यांनी तपासणी केली असता महिलेच्या अंगात रक्‍त कमी असल्‍याचे दिसून आले. शिवाय पोटात देखील रक्‍त जमा झाल्‍याचे तपासणी आढळले. 

करावी लागली कुटूंब नियोजनाची शस्‍त्रक्रिया
तपासणीदरम्‍यान महिलेच्या गर्भनलिकेत गर्भ राहिल्‍यानंतर तो फुटल्‍याचे निदान झाले. यामुळे पोट दुखत असून, प्रकृती खालावत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. यानंतर कोणताही वेळ न घालविता तात्‍काळ शस्‍त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्‍टरांनी घेतला. त्‍यानुसार महिलेची शस्‍त्रक्रिया करून पोटात जमा झालेले रक्‍त बाहेर काढले. तसेच फुटलेल्‍या गर्भ आणि गर्भनलिका काढून कुटूंब नियोजनाची शस्‍त्रक्रिया करण्यात आली. या शस्‍त्रक्रियेमुळे महिलेचे प्राण वाचले असून महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्‍यानंतर तिला घरी सोडण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT