जळगाव

‘G गुगल क्लासरूम’साठी एक लाख १८ हजार ८१३ ‘गुरुG’ तयार !

उमेश काटे

अमळनेर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असल्या तरी राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये, यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘गुगल क्लासरूम’ची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ४० हजार शिक्षकांना ‘ऑनलाइन प्रशिक्षण’ देण्यात येणार आहे. यासाठी एक लाख १८ हजार ८१३ शिक्षकांची ऑनलाइन नावनोंदणी झाली आहे. यात पुणे विभाग आघाडीवर असून, नागपूर या विभागातील शिक्षकांनी नावनोंदणीकडे पाठ फिरविल्याने पिछाडीवर आहे. 

राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यामधील तंत्रस्नेही शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षित केले जाणार आहे. सध्या राज्यात प्राथमिक शाळेपासून बारावीपर्यंतच्या वर्गांना सुमारे सात लाख शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत आहेत. यात शिक्षण विभागाकडून नावनोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात ४० हजार शिक्षकांना राज्यस्तरावर तीन तासांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर तालुकानिहाय तालुकास्तरावर उर्वरित शिक्षकांसाठीदेखील हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण घेतलेले शिक्षक अन्य शिक्षकांना शिकवणार आहेत. नावनोंदणी केलेल्या शिक्षकाकडे इंटरनेट सुविधेसह डेस्कटॉप संगणक किंवा laptop अथवा केवळ प्रशिक्षण कालावधीपुरते ज्यांना इंटरनेट सुविधेसह दोन स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे. 

 
काय आहे ‘गुगल क्लासरूम’ 
‘गुगल क्लासरूम’ म्हणजे वर्गाचीच ई प्रतिकृती. याअंतर्गत प्रत्येक शिक्षकास, विद्यार्थ्यास शाळेसाठी जी सूट (G Suite) आयडी तयार करून देण्यात येणार आहे. याच्या सहाय्याने शिक्षक एका वेळी कमाल २५० विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन तासिका घेऊ शकणार आहेत. यात गृहपाठ, वर्गपाठ, मूल्यांकनदेखील ऑनलाइन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना घरी देण्यात आलेला अभ्यास तपासण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. 


राज्यातील ऑनलाइन झालेली नोंदणी 

विभाग ः नोंदणी शिक्षक 
पुणे : २६,३४७ 
कोकण : २६,१४१ 
औरंगाबाद : २१,७१० 
नाशिक : १८,२८२ 
अमरावती : १३४५४ 
नागपूर : १२,८२५ 
एकूण : ११,८८१३ 


नाशिक विभाग 

जिल्हा- नोंदणी शिक्षक 
नाशिक : ६,३५२ 
जळगाव : ४,२४६ 
धुळे : २,६२२ 
नंदुरबार : १,४६६ 
नगर : ३,५९६ 
एकूण : १८,२८२ 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT