जळगाव

जोरदार वादळ आले...अन्‌ दिड वर्षीय चिमुकलीला घेवून गेले ! 

सकाळवृत्तसेवा


कजगाव (ता. भडगाव)  : उमरखेड (ता. भडगाव) येथे दुपारी आलेल्या वादळामुळे मातीचे घर कोसळून ढिगाऱ्याखाली तीन सख्ख्या बहिणी दाबल्या गेल्या. यात दीड वर्षीय बालिका मृत झाली, तर दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे उमरखेडमध्ये शोककळा पसरली आहे. 

उमरखेड येथे आज दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास वातावरणात हवेचा जोर अचानक वाढला. यामुळे मातीच्या घराचे धाबे व भिंत कोसळली. यावेळी घरात झोपलेल्या सख्ख्या तीन बहिणी दाबल्या गेल्या. यात नयना दीपक सोनवणे ही दीड वर्षाच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला; तर शालू दीपक सोनवणे (वय ३) व शारदा दीपक सोनवणे (वय ५) या दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तत्काळ कजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. तेथून रुग्णवाहिकेने चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना घडली, तेव्हा मुलीचे वडील दीपक सोनवणे हे कामावर गेले होते; तर आई अंगणात धुणे धूत होती. अचानक घर कोसळल्याने आईने एकच आरडाओरडा केल्याने परिसरातील रहिवासी धावून आले. मातीचे ढिगारे बाजूला सारत त्याखाली दाबल्या गेलेल्या मुलींना बाहेर काढले. माती, दगड व लाकडाचा थर तिन्ही चिमुरडींवर पडल्याने त्या अत्यव्यस्थ झाल्या होत्या. उमरखेड हे छोटेसे असल्याने गावात ठराविक ग्रामस्थ होते. मुलींचे आजोबा शिवाजी भिल यांच्यासह श्यामराव पाटील, प्रवीण जाधव, रघुनाथ भिल, गोकुळ पाटील व इतरांनी मदतकार्य केल्याने दोन्ही बहिणींचा जीव वाचला. ही घटना कळताच सरपंच उमेश देशमुख, सदस्य राजेंद्र बच्छे, सुनील महाजन, मंगा भिल, सुमनबाई भिल, ग्रामसेवक एस. बी. मोरे यांनी घटनास्थळ गाठले. तहसीलदार माधुरी आंधळे, कजगावचे मंडलाधिकारी बी. डी. पाटील, भोरटेकचे तलाठी रत्नदीप माने, कजगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, कोतवाल कविता सोनवणे यांनीही भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे सोनवणे परिवार अक्षरशः उघड्यावर आला आहे. या कुटुंबाला तत्काळ शासकीय मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT