जळगाव

गांजा विक्रीतून चिक्कार कमावला पैसा...आणि त्यावरच तो झोपायचा ! 

सकाळवृत्तसेवा

चाळीसगाव ः "साहेब, चाळीसगावात गांजा इतका सर्रास मिळतो, की तुम्ही सांगितले, की किलोभर गांजा पाहिजे आहे, तर किलो दोन किलो गांजा सहज मिळेल', असे आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना काही दिवसांपूर्वी सांगितले होते. आमदारांचे हे म्हणणे शंभर टक्के खरे असल्याचा प्रत्यय शहर पोलिसांनी काल (17 जून) शहरातील नागदरोड भागात केलेल्या कारवाईवरून दिसून आला. पोलिसांनी गांजाची विक्री करणाऱ्या मायलेकाला अटक केली असून त्यांच्याकडून 2 किलो गांजा व साडे सोळा लाखांची रोकड जप्त केली. 

पोलिसांनी सांगितले, की शहरातील नागद रोडवरील झोपडपट्टीत पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या सलीम अली याच्या घरी गांजा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, उप विभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे, सहाय्यक निरीक्षक मयूर भामरे, उपनिरीक्षक विजय साठे यांच्यासह पोलिस कर्मचारी गणेश पाटील, पंकज पाटील, विनोद भोई, सुभाष घोडेस्वार, पंढरीनाथ पवार, प्रवीण संगीले, तुकाराम चव्हाण, प्रवीण सपकाळे, नीलेश पाटील, राकेश पाटील, संदीप भोई, महेंद्र साळुंखे, महिला पोलिस कर्मचारी सोनी तडवी यांच्या पथकाने सलीम अली (वय 35) राहत असलेल्या घरी काल (17 जून) रात्रीच्या सुमारास सापळा रचून छापा टाकला. यावेळी सलीम अली हा घरात पलंगावर बसलेला होता. तर त्याची आई नसीमबी अशरफ अली (वय 55) घरात होती. सलीम अली अपंग असून त्याला पायांवर उभे राहत येत नाही. त्याच्या घराची तपासणी केली असता, घरात 6 हजार 510 रुपयांचा 2 किलो गांजा मिळून आला. शिवाय पलंगाच्या बाजूला असलेल्या लोखंडी पेटीत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम मिळून आली. ती मोजली असून 16 लाख 55 हजार रुपये निघाली. याशिवाय दोन्हींचे पाच हजारांचे दोन मोबाईलही मिळून आले. असा सर्व मिळून आलेला एकूण 16 लाख 66 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी दोन्ही मायलेकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर भामरे करीत आहेत. 

आमदारांची माहिती खरी ठरली 
चाळीसगावात गांजा विक्री करणाऱ्यांचे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांना मिळाली असून काही दिवसांपूर्वी गांजा विक्री केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात लाच मागणाऱ्या येथील दोन पोलिसांवर जळगावच्या लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती. त्याचा संदर्भ देत, आमदार चव्हाण यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना गांजा विक्री प्रकरणी कसून चौकशीची मागणी केली होती. शहरात दोन किलो गांजा मिळून आल्याने आमदार मंगेश चव्हाणांना मिळालेली माहिती खरी असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. 

मोबाईलवरील कॉल्सवरून शोध घ्यावा 
झोपडपट्टीत झोपडीत राहणाऱ्या मायलेकाकडे गांजा व एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड मिळून आल्याने पोलिसांनाही आश्‍चर्य वाटत आहे. गांजा विक्रेता संशयित सलीम अली व त्याच्या आईने पोलिसांना अद्याप तरी कोणतीच माहिती दिलेली नाही. या दोन्हींचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून त्यावर आलेल्या कॉल्सवरून हा गांजा त्यांनी कुठून आणला, त्याचे ग्राहक कोण आदी सर्व माहिती मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने चौकशी करून हा गांजा विक्री मागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध घेऊन याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

त्याचा कोणावरंच विश्‍वास नव्हता 
दिव्यांग सलिम अली हा गांजा विक्री अनेक वर्षापासून करत होता. त्यामुळे त्याने या व्यवसायातून चिक्कर पैसा कमावला. मोठ्या प्रमाणात जमा झालेला पैसा घरातच असल्याने त्याचा कोणावर विश्‍वास नव्हता. त्यामुळे त्याने पलंगावर पैसा अंथरून या पैशाच्या गादीवर तोच झापायचा. त्याच्या पलांगाली लोखंडी पेटीत देखील मोठ्या प्रमाणात रोकड पोलिसांनी आढळून आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT