जळगाव

पंतप्रधान अन्न योजना ठरली फोल; सर्वसामान्यांच्या ताटातून ‘चना’ गायब 

सुनील पाटील

चोपडा ः ‘कोरोना’च्या संकटकाळात समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या सर्व घटकांसाठी भारत सरकारतर्फे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून सार्वजनिक वितरण विभागाद्वारे मोफत धान्य वाटप करण्यात आले. यात तांदूळ, गहू, डाळ यांचे वाटप झाले. मात्र, यात विनाशिधापत्रिकाधारकांना (रेशनकार्ड नसलेल्या)ही धान्य मिळावे, या हेतूने मे आणि जून या दोन महिन्यांत प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ व प्रतिकुटुंब एक किलो हरभरा (चना) मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.

त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील धान्य वितरण केंद्रांवर मोफत तांदूळ वितरित करण्यात आला. मात्र हरभऱ्याचे वितरण अद्यापपर्यंत झाले नसल्याने विनाशिधापत्रिकाधारकांच्या ताटातील चना गायब झाला असून, मे व जून हे दोन्ही महिने उलटले तरी हरभरा मिळालाच नसल्याचे दिसून येत आहे. 
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाच्या एकूण संख्येच्या दहा टक्के कुटुंब विनाशिधापत्रिकाधारक असे गृहीत धरून हे धान्य वाटप करण्याचे केंद्र शासनाचे आदेश होते. यानुसार जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब असे एकूण पाच लाख ९९ हजार ५१७ इतके आहेत. त्याचे दहा टक्के म्हणजे ५९ हजार ९०० कुटुंब विनाशिधापत्रिकाधारक असल्याचे वितरण व्यवस्थेने गृहीत धरले. यात या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस पाच किलो तांदळाचे वाटप करण्यात आले. मात्र, यासोबत एका कुटुंबास एक किलो याप्रमाणे हरभऱ्याचे वितरण झालेच नाही. यामध्ये जिल्हाभरातील ५९ हजार ९०० कुटुंबांना प्रत्येकी एक किलो प्रमाणे ५९९ क्विंटल असे दोन महिन्यांचे जवळपास एक हजार २०० क्विंटल हरभऱ्याचे नियतन प्राप्त झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. 

विनाशिधापत्रिकाधारक कुटुंबसंख्या 
जळगाव जिल्ह्यात एकूण लाभार्थी संख्येच्या दहा टक्के विनाशिधापत्रिकाधारक कुटुंबसंख्या अशी आहे. या कुटुंबांना अद्यापही हरभरा मिळालेला नाही. (तालुका व कंसात संख्या) 
जळगाव : (सात हजार ४००) 
जामनेर : (चार हजार ९००) 
एरंडोल : (दोन हजार ५५०) 
धरणगाव : (दोन हजार ९००) 
भुसावळ : (तीन हजार ८००) 
बोदवड : (एक हजार ४००) 
यावल ः (चार हजार) 
रावेर : (पाच हजार ५९) 
चोपडा : (चार हजार ३००) 
पारोळा : (दोन हजार ९४०) 
मुक्ताईनगर : (दोन हजार ७०३) 
पाचोरा : (चार हजार ६००) 
भडगाव ः (दोन हजार ६३२) 
चाळीसगाव ः (सहा हजार १५०) 
अमळनेर ः (चार हजार ६००) 
एकूण : ५९ हजार ९०० कुटुंब 


धान्य वाटपासंदर्भात प्रत्यक्ष भेटी देऊन खात्री केलेली आहे. मात्र, तरीही वितरण व्यवस्थेकडून चना प्राप्त झाला आहे किंवा नाही, ही खात्री करून घ्यावी लागेल. धान्य तत्काळ उपलब्ध करून देण्यात आले होते. या योजनेत पुढच्या टप्प्यात १०० टक्के देण्यात येईल. दोन महिन्यांत जे मिळाले नसेल ते पुढील पाच महिन्यांच्या वाटपात वाढवून देण्यात आले आहे. 
-उन्मेष पाटील, खासदार, जळगाव 


संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT