sari
sari 
जळगाव

जळगावात आता ‘सारी’चा विस्‍फोट; अकरा रुग्ण आढळले 

देविदास वाणी

जळगाव : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत महापालिकेने आतापर्यंत १३४ आरोग्य पथकांमार्फत शहरातील ३९ हजार २७ घरातील एक लाख ३५ हजार ३१७ नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे. त्यात ‘सारी’ आजाराचे ११ तर सर्दी, खोकल्याचे ८४ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली. 

शहरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी महापालिकेने १३४ पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकात आरोग्य सेवकासह स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व संघटनांनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचा समावेश आहे. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान ५० घरांना भेटी देत आहेत. ही पथके घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन, कोमॉर्बिड रुग्ण आहेत का, याची माहिती घेण्यात येत आहे. ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविडसदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भात करण्यात येत असून, तेथे कोविडच्या तपासणीसाठी स्वॅब चाचणी घेऊन पुढील उपचार केले जात आहेत. शहरात नवीपेठ, शिवाजीनगर, सुभाष चौक, जुनेगाव, इंडिया गॅरेज, तांबापुरा, गावठाण, पिंप्राळा, हरिविठ्ठलनगर आणि सुप्रिम कॉलनी असे दहा आरोग्य विभाग कार्यरत आहेत. या दहा विभागांत महापालिका प्रशासनाच्या वतीने १३४ आरोग्य पथके कार्यरत आहेत. 
 
लक्षणे दिसणार्यांची चाचणी 
या तपासणीत ५० वर्षे वयावरील व्यक्तींची संख्या २४ हजार ८२६ इतकी आहे. यापैकी ३ हजार ९४३ व्यक्ती कोमार्बिड, सर्दी, ताप, खोकल्याचे ४७ ,तर सारीचे १० रुग्ण आढळून आले आहे. ४९ संशयितांना तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले होते. त्यापैकी १९ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ५० वर्षांखालील व्यक्तींपैकी ६०६ व्यक्ती कोमॉर्बिड, सर्दी, ताप, खोकल्याचे ३७, तर सारीचा १ रुग्ण आढळून आला आहे. यापैकी २७ संशयितांना तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले होते. त्यापैकी ६ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. रावलानी यांनी दिली. 
 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT