जळगाव

कोरोनाचा उद्रेकः नव्या बाधितांसह आज बरे होणाऱ्यांचेही ‘रेकॉर्ड’ 

सचिन जोशी

जळगाव  : गेल्या चार महिन्यातील कोरोना संसर्गाच्या काळात एका दिवसात आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांसह बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येचा आज विक्रम झाला. गेल्या दिवसभरात ५२० नवे रुग्ण आढळून आले, तर ४३२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या २४ तासांत पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नव्या बाधितांमध्ये जळगाव शहरातील सर्वाधिक दीडशेवर रुग्ण आहेत. 

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आज उद्रेक झाल्याचे आकड्यांवरुन समोर आले. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात विक्रमी ५२० रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १४ हजार ८६३वर पोचली. तर दिवसभरात ४३२ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे होणाऱ्यांची संख्याही १० हजारांचा टप्पा ओलांडून १० हजार ३०५ झाली. वाढत जाणाऱ्या रग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडत आहे. एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना त्या तुलनेत मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने ती दिलासादायक बाब आहे. गेल्या २४ तासांत ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ६१३ झाली आहे. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर १५४, जळगाव ग्रामीण ३९, भुसावळ १७, अमळनेर ३४, चोपडा १३, पाचोरा ८, भडगाव १६, धरणगाव ६, यावल १३, एरंडोल ४०, जामनेर ७१ रावेर ७, पारोळा ११, चाळीसगाव ५५, मुक्ताईनगर २५, बोदवड ३. 

जळगाव शहरासह४ तालुके हजारी पार 
जिल्ह्यात जळगाव शहरासह चार तालुक्यांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येने हजाराचा टप्पा पार केला आहे. जळगाव शहरात एकूण ३६९७ रुग्ण आहेत. भुसावळ तालुक्यात १०४९, अमळनेर तालुक्यात १०८९, चोपड्यात १०८०, जामनेर तालुक्यात १०८६ रुग्ण आहेत. 
 

 संपादन-भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क..

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT