pool testing
pool testing 
जळगाव

‘पूल टेस्टिंग’द्वारे समूह संसर्गाची चाचपणी 

सचिन जोशी

जळगाव : जिल्ह्यासह शहरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासन हतबल झाले आहे. जळगाव शहरात गेल्या महिनाभरात दोन हजार रुग्ण वाढल्याने शहरातील हॉटस्पॉट ठरलेल्या भागात ‘पूल टेस्टिंग’ सुरू झाले असून, त्याद्वारे समूह संसर्ग झाला की नाही, याची चाचपणी केली जात आहे. त्यासाठी शहरातील दहा ठिकाणे निश्‍चित केली असून, या मोहिमेस मनपा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने गती दिली आहे. 
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असून, दररोज सरासरी तीनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात गेल्या महिन्यात ७ ते १३ जुलैदरम्यान पूर्ण कडक लॉकडाउन केल्यानंतरही संसर्ग आटोक्यात येत असल्याचे दिसून येत नाही. प्रशासनाने त्यासाठी दोन महिन्यांपासून टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट अशा ‘थ्री-टी’नुसार काम सुरू केले आहे. त्याचाच उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात ॲन्टिजेन चाचण्याही केल्या जात आहेत. 

आता ‘पूल टेस्टिंग’द्वारे गती 
जळगाव शहरातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी ‘पूल टेस्टिंग’सारखी मोहीम सुरू करण्यात आल्या आहेत. या टेस्टिंगद्वारे शहरात जास्त एकाच भागात दहापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्यास अशा भागांमध्ये पूल टेस्टिंगची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी शहरातील विविध ठिकाणचे दहा हॉटस्पॉट निश्‍चित करण्यात आले आहेत. या सर्वाधिक प्रभावित भागात समूह संसर्ग झालाय की नाही, हे या पूल टेस्टिंगद्वारे समजण्यास मदत होणार आहे. आतापर्यंत जळगाव शहरातील तीन-चार भागात ‘पूल टेस्टिंग’ सुरू झाली आहे. 

काय आहे ‘पूल टेस्टिंग’ 
पूल टेस्टिंगमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण असलेल्या भागात बाधित रुग्णांच्या केवळ कमी जोखमीतील (लो रीस्क) संशयितच नव्हे, तर सभोवतालच्या परिसरातील लक्षणे नसलेल्या रुग्णांनाही एका ठिकाणी बोलावून त्यांच्या स्वॅबचे नमुने घेतले जातात. एका पूलमध्ये पाच, असे दहा बॅचेसमधील ५० संशयितांचे स्वॅब असतात. त्या प्रत्येक स्वॅबची आरटीपीसीआर चाचणी न करता प्रत्येकी पाच स्वॅबचा थोडा अंश घेऊन त्याची चाचणी केली जाते. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रत्येक स्वॅबची स्वतंत्र चाचणी होते. निगेटिव्ह आल्यास चाचणी केली जात नाही. 
 
...असे होतात फायदे 
पूल टेस्टिंग काही वेळातच होते. त्यामुळे त्यात बऱ्यापैकी वेळ वाचतो. ही चाचणी निगेटिव्ह आली, तर अन्य रुग्णांच्या चाचणीची गरज राहत नाही. त्यामुळे तोदेखील वेळ वाचतो. चाचणी पॉझिटिव्ह आली, तर सर्व पाचही रुग्णांच्या स्वॅबची चाचणी होऊन पुढचे संशयित ‘ट्रेस’ करणे सोपे जाते. शिवाय, त्या संबंधित भागात समूह संसर्गाची स्थिती आहे का, याचाही अंदाज येतो. 

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT