Gram panchayat election
Gram panchayat election 
जळगाव

जुलैत २१ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी आदेशाची प्रतिक्षा

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जिल्ह्यात आगामी जुलै महिन्यात चोपडा, यावल, रावेर या तालुक्यातील सुमारे २१ ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतीबाबत (Gram panchayat election) निवडणूक आयोग (Election Commission) काय आदेश देते याबाबत जिल्हा प्रशासनाला प्रतिक्षा आहे. यानिवडणूकांसाठीची तयारी मार्चपासूनच सुरू होण्याची गरज होती. मात्र अद्यापपर्यंत आयोगाचे काहीच आदेश न आल्याने जिल्हा परिषदेने (Jalgaon zilha parishad) या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. (jalgaon-district-21-gram-panchayat-term-expires-in-July)

जिल्ह्यासह राज्यात कोरोना महामारीमुळे सर्वच प्रकारच्या निवडणुकांना स्थगिती आहे. मात्र आता कोरोनाची स्थिती आटोक्यात येत आहे. निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकांच्या तयारी बाबत आदेश काढलेले नाहीत. यामुळे जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करावी लागणार आहे.

डिसेंबर अखेर ३१ ग्रामपंचायती

जानेवारी ते डिसेंबर २०२१ दरम्यान जिल्ह्यात ३१ ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. त्यांच्या निवडणूका घेणे अपेक्षीत आहे. मात्र गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होवू नयेसाठी निवडणूक आयोगाने सर्वच प्रकारच्या निवडणूकांना स्थगिती दिली आहे.

जुलैत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती

यावल तालुका - परसाडे, मालोद

चोपडा तालुका -मोरचीडा, वैजापूर, उमर्टी, सत्रासेन, मोहरद, मेलाणे, करजाणे, देव्हारी, बोरअजंती.

रावेर तालुका- कुसूंबा खूर्द, कुसूंबा बुद्रूक, लोहारा, पाल, मोहमांडली गृप, निमड्या, पाडळे बुद्रूक, जिन्सी, सहस्त्रलिंग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT