SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Sunrisers Hyderabad Defeat Lucknow Super Giants
Sunrisers Hyderabad Defeat Lucknow Super Giants esakal

अभिषेक शर्माचे दमदार अर्धशतक 

अभिषेक शर्माने 2 चेंडूत नाबाद 75 धावा ठोकल्या. त्याने 16 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केलं. ट्रॅविस हेडने 30 चेंडूत 89 धावा चोपून लखनौच्या गोलंदाजांची खांडोळीच केली.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

लखनौ सुपर जायंट्सचे 165 धावांचे आव्हान सनराईजर्स हैदराबादनं 9.4 षटकातच पार केलं. लखनौचा 10 विकेट्सनी पराभव करत हैदराबादने प्ले ऑफच्या दृष्टीकोणातून एक पाऊल पुढं टाकलं.

SRH vs LSG Live Score : पुरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

आयुष बदोनीने 30 चेंडूत नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर निकोलस पूरननं 26 चेंडत नाबाद 48 धावा ठोकून लखनौला 20 षटकात 4 बाद 165 धावांपर्यंत मजल मारून दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 99 धावांची भागीदारी रचली.

संथ खेळपट्टीवर लखनौची संथ फलंदाजी 

लखनौ सुपर जायंट्सने 8 षटकात 2 बाद 45 धावा केल्या आहेत. केएल राहुल 25 चेंडूत 20 धावा करून खेळतोय. तर कृणाल पांड्या 13 चेंडूत 19 धावा करून खेळतोय. खेळपट्टी संथ असल्यानं धावा करणे अवघड जात आहे.

SRH vs LSG Live Score : लखनौची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

भुवनेश्वर कुमारने लखनौचा सलामीवीर क्विंटन डिकॉकला 2 धावांवर बाद केलं. यानंतर लखनौने 3 षटकात 15 धावा केल्या.

लखनौ सुपर जांयट्सने नाणेफेक जिंकली. 

लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौच्या संंघात बदल करण्यात आले आहेत. क्विंटन डिकॉक परतला असून मोहसीन खानला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळालेलं नाही. पॅट कमिन्सनं देखील संघात दोन बदल केले आहेत.

SHR vs LSG : हेड टू हेड 

लखनौ सुपर जायंट्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. त्यातील तीनही सामने लखनौने जिंकला आहे. गेल्या वर्षी लखनौने हैदराबादच्या होम ग्राऊंडवर 183 धावांचे टार्गेट चेस केले होते.

Sunrisers Hyderabad Defeat Lucknow Super Giants : हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा 10 विकेट्स राखून केला पराभव 

सनराईजर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सने 166 धावांचे आव्हान 9.4 षटकातच पार करत सामना 10 विकेट्स राखून जिंकला. अभिषेक शर्माने 28 चेंडूत नाबाद 75 धावांची तर ट्रॅविस हेडने 30 चेंडूत नाबाद 89 धावांची खेळी केली. या दोघांनीच हैदाबादला विजय मिळवून दिला.

या विजयासोबतच हैदराबादने गुणतालिकेत 14 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. हैदराबादच्या विजयामुळे मुंबई इंडियन्स अधिकृतरित्या प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर गेली आहे.

लखनौ सुपर जायंट्सने सनराईजर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र संथ खेळपट्टीवर लखनौला पॉवर प्लेमध्ये 27 धावाच करता आल्या.

पॉवर प्लेनंतर लखनौने आपला गिअर बदलला अन् सनराईजर्स हैदराबादविरूद्ध 20 षटकात 5 बाद 165 धावा केल्या. लखनौकडून आयुष बदोनीने सर्वाधिक 30 चेंडूत 50 धावा केल्या. तर निकोलस पूरनने त्याला 48 धावा करून उत्तम साथ दिली. केएल राहुलने 29 तर क्रुणाल पांड्याने 24 धावांचे योगदान दिले. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने चांगला मार करत 2 विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com