gold gold
जळगाव

सोने पुन्हा चकाकणार..प्रतितोळा ५० हजार भाव जाणार !

कोरोना विषाणूची नवी लाट, जागतिक महागाईची भीती आदी कारणांमुळे सोन्यांच्या दरात वाढ झाली आहे.

देविदास वाणी

जळगाव : कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी राज्यभरात संचारबंदी आहे. सुवर्ण बाजारासह अनेक वस्तूंची दुकाने, मॉल जी अत्यावश्‍यक नाहीत त्यांना लॉकडाउनमध्ये बंदी आहे. असे असले तरी सोन्याचे दर वधारणार असून, ५० हजारांचा टप्पा (दर १० ग्रॅम) पार करेल, असा विश्‍वास सराफ व्यावसायिकांना आहे. सध्या सोन्याचा दर दहा ग्रॅमसाठी ४७ हजार आहे.

गेल्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात ५.४० टक्क्यांनी वाढ झाली. सध्या प्रतितोळा (दहा ग्रॅम) ४७ हजार १७५ असा दर आहे. कोरोनामुळे बँकांचे व्याजदर घटविले आहेत. इतर फंड, शेअरमध्येही हवा तसा परतावा मिळण्यास उशीर लागतो. मात्र सोन्यात केलेली गुंतवणूक केव्हाही फायद्याची असते. कारण सोने केव्हाही मोडता येते. त्या मुळे सोन्यात नागरिक गुंतवणूक आताही करीत आहेत. बाजारामध्ये असे बरेच घटक आहेत जे सोन्याला सहकार्य करतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याने प्रतिऔंस १७५२ डॉलरचा भक्कम अवरोध ओलांडला आहे. तो प्रतिऔंस १७६२ डॉलरवर व्यापार करीत आहेत. त्याचवेळी बाजारपेठेत ४९ हजारा़पर्यंत सोने पोचले आहे. काही दिवसांपूर्वी सोने ४४ हजार रुपये प्रतितोळापर्यंत पोचले होते. त्यात दिवसेंदिवस वाढत होत आहे. कोरोना विषाणूची नवी लाट, जागतिक महागाईची भीती आदी कारणांमुळे सोन्यांच्या दरात वाढ झाली आहे.

अक्षयतृतीयेपर्यंत सोन्याच्या दरात वाढ

सध्या महाराष्ट्रात सोने व्यापार बंद आहे. असे असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने बाजार सुरूच आहे. सध्या भाव कमी असले तरी दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. एकीकडे नागरिक कमी दरात सोने घेण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे सोन्याच्या बाजारपेठा बंद आहे. या मुळे सोन्यात गुंतवणुकीला नागरिक प्राधान्य देतात. कोरोनाचे सावट असल्याने अत्यावश्‍यक वगळता इतर व्यवसाय अनिश्‍चि‍त काळासाठी बंद आहेत. मागणी असल्याने सोने ५० हजारांचा टप्पा पार करेल. अक्षयतृतीयेपर्यंत सोन्याच्या दरात वाढ नक्की होणार.

सोने आता व्यवसाय बंद असताना ४८ हजारांवर पोचले आहे. लॉकडाउननंतर नक्कीच पन्नास हजार रुपये प्रतिदहा ग्रॅम असेल. नागरिकांची मागणी सोन्याला आहे. कारण केव्हाही सोने मोडून तत्काळ पैसे हातात येतात. अक्षयतृतीयेपर्यंत सोन्याचे दर वाढतील.

-मनोहर पाटील, व्यवस्थापक, रतनलाल सी बाफना ज्वेलर्स.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मेघगर्जना अन् विजांचा कडकडाट! पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रात कसा असेल पाऊस? हवामान विभागाचा अंदाज

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

अकोल्यात हातात बांगड्या, ओठांवर लिपस्टिक... धावत्या ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढणं पडलं महागात; टवाळखोराला अनोखी शिक्षा

'एसआयआर'मधून नाव वगळल्यास नागरिकत्व धोक्यात येईल का? सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश, निवडणूक आयोगाला बजावली नोटीस

Cow Slaughter Case: जुन्नरमध्ये माई मोहल्ल्यात गोवंश कत्तलीवर पोलिसांची धडक कारवाई; २७० किलो गोमांस जप्त, आठ जणांवर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT