esakal | वृध्द‘सुदामा’भिक्षेकरीला..भगवान श्रीरामांमुळे मिळाला‘महाल’
sakal

बोलून बातमी शोधा

sakal logo

वृध्द‘सुदामा’भिक्षेकरीला..भगवान श्रीरामांमुळे मिळाला‘महाल’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : आजवर आपण गरीब सुदाम्याची गोष्ट एकून होतो, की त्याने दिलेल्या पोह्यांच्या बदल्यात भगवान श्रीकृष्णाने सुदामास राजमहल उभारून दिला होता. मात्र ही बाब आपल्या भोवताली घडल्यास सर्वांना आश्चर्य वाटेलच. कुंभारखेडा (ता. रावेर) येथे पडक्या कुळाच्या घरात आपल्या पत्नीसोबत संपूर्ण आयुष्य वीज न घेता, अंधाऱ्यात राहून उदरनिर्वाह करणाऱ्या कोष्टी परिवाराला आजरोजी प्रभू श्रीरामांमुळे स्वतःचे घर मिळाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा: राज्यात जळगावचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वांत कमी

अयोध्येत श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन मोहिमेरम्यान कार्यकर्ते घरोघरी जावून निधी गोळा करीत होते. याप्रसंगी कुंभारखेडा (ता. रावेर) येथे कार्यकर्ते निधी संकलनासाठी गेले असता त्या गावातील नारायण सखाराम कोष्टी (वय ८७) यांनी आपली परिस्थिती नसताना घरातील भंगार डब्यातील तीन ते चार पिशव्या शोधून त्यातील शंभर रुपयांची नोट काढून प्रभू श्रीराम निधी संकलनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना दिली. त्या वेळी कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटले. कुडाच्या घरात राहणारे, तसेच घरात कुठलेही वीज कनेक्शन न घेता, आपले संपूर्ण आयुष्य अंधाऱ्यात जगणारे तसेच गावात भिक्षा मागून आपल्या परिवाराचा गाडा ओढणारे खरोखरच प्रभू श्रीरामांवर एवढे प्रेम करीत असतील, हे विरळेच उदाहरण आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात ५० व्हेंटिलेटर आठवडाभरात येणार !

सोशल मिडीयावर व्हायरल...

या सर्व प्रसंगाची चित्रफीत कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये तयार करून फेसबुक व ट्विटरवर अपलोड केली. भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील रहिवासी सध्या औरंगाबाद येथील उद्योजक अश्विनकुमार परदेशी यांनी तो व्हिडिओ पहिला व ताबडतोड चौकशी केली असता, तो परदेशी यांच्या परिचयातील मित्र निघाला. त्यांनी लागलीच कुंभारखेडा गावातील ग्रामपंचायत कार्यालय गाठले. सरपंच लताबाई बोंडे यांची भेट घेतली व नारायण कोष्टी यांनी सरकारी योजनांचा लाभ घेतल्याबाबत विचारणा केली असता, या परिवाराने एकही योजनेचा लाभ घेतला नाही. आपली भिक्षा मागून घराचा उदरनिर्वाह करीत असल्याचे समजले.

हेही वाचा: तू मारल्यासारखं कर.. मी रडल्यासारखं करेल..!

देव देतो छप्पर फाडून...

‘देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो’ असाच प्रकार नारायण कोष्टी यांच्यासोबत घडला. नारायण कोष्टी यांचे कुडाचे घर अश्विनकुमार परदेशी यांनी स्व:खर्चाने दोन लाख रुपये लावून पंधरा दिवसांत बांधून गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सरपंच लता बोंडे यांच्या उपस्थितीत नारायण कोष्टी व पत्नी यांच्या हस्ते फित कापली. तसेच नारायण कोष्टी यांना दोन ड्रेस व त्यांच्या पत्नीला दोन साड्या तसेच साहित्य उद्योजक परदेशी यांनी दिले. यासाठी कल्पेश इंगळे, भाग्येश चौधरी, सचिन पाटील, ईश्वर पाटील, चंदन महाजन, कुणाल पाटील, लोकेश राणे यांनी श्री. परदेशी यांना अनमोल सहकार्य केल्यामुळे शक्य झाले.

संपादन- भूषण श्रीखंडे