जळगाव

जळगाव शहरात एक लाख नागरिकांच्या झाल्या तपासण्या !

देविदास वाणी

जळगाव  ः माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत जळगाव शहर महानगरपालिकेने आतापर्यंत १३४ आरोग्य पथकांमार्फत शहरातील ३९ हजार २७ घरातील एक लाख ३५ हजार ३१७ नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे. अशी माहिती आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली. शहरात ‘सारी’ ११ तर सर्दी, खोकल्याचे ८४ रुग्ण आढळले आहेत. 

शहरातील नागरीकांच्या आरोग्य तपासणीसाठी महापालिकेने १३४ पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकात आरोग्य सेवकासह स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व संघटनांनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचा समावेश आहे. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान ५० घरांना भेटी देत आहेत. ही पथके घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन, कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेण्यात येत आहे. ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भात करण्यात येत असून तेथे कोविडच्या तपासणीसाठी स्वॅब चाचणी घेण्यात येवून पुढील उपचार केले जात आहेत. 

शहरात ही मोहीम २५ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. यात पहिली फेरी १० ऑक्टोबर २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून दुसरी फेरी १४ ते २४ ऑक्टोबर २०२० या कालावधीत होणार आहे. पहिल्या फेरीचा कालावधी १५ दिवसांचा असून दुसऱ्या फेरीचा कालावधी हा १० दिवसांचा राहणार आहे. 

शहरात नवीपेठ, शिवाजीनगर, सुभाषचौक, जुनेगाव, इंडिया गॅरेज, तांबापूरा, गावठाण, पिंप्राळा, हरी विठ्ठल नगर आणि सुप्रीम कॉलनी असे दहा आरोग्य विभाग कार्यरत आहेत. या दहा विभागात महापालिका प्रशासनाच्यावतीने १३४ आरोग्य पथके कार्यरत करण्यात आली आहे. या पथकांमार्फत शहरात आत्तापर्यंत ३९ हजार २७ घरांना भेटी दिल्या असून १ लाख ३५ हजार ३१७ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. 
 

शहरात ‘सारी’चे ११ रुग्ण 
या तपासणीत ५० वर्षे वयावरील व्यक्तींची संख्या २४ हजार ८२६ इतकी आहे. यापैकी ३ हजार ९४३ व्यक्ती या कोमार्बिड, सर्दी, ताप, खोकल्याचे ४७ तर सारीचे १० रुग्ण आढळून आले आहे. ४९ संशयितांना तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले होते. त्यापैकी १९ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 
५० वर्षाखालील व्यक्तींपैकी ६०६ व्यक्ती कोमॉर्बिड, सर्दी, ताप, खोकल्याचे ३७ तर सारीचा १ रुग्ण आढळून आले आहे. यापैकी २७ संशयितांना तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले होते. त्यापैकी ६ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. रावलानी यांनी दिली. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT