mahavitara mahavitara
जळगाव

पडद्यामागील ‘कोरोनायोद्धे’ : अखंडित विजेसाठी राबताहेत हजारो हात

पडद्यामागील ‘कोरोनायोद्धे’ : अखंडित विजेसाठी राबताहेत हजारो हात

सकाळ डिजिटल टीम

पारोळा (जळगाव) : कोरोनाच्या संकटकाळात (Coronavirus) नागरिक सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी शासन वेगवेगळ्या विभागामार्फत तत्काळ सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. यात आरोग्य, महसूल व पालिका यांची मोलाची भूमिका असते. त्यांच्या संयुक्त कामगिरीतून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जातात. या महामारीत प्रशासनाला महावितरणची (Mahavitaran) देखील मदत मिळत असते. अखंडित वीजपुरवठ्यामुळे यंत्रणेचे काम सुरळीत होत आहे. लाइनमन (Wireman) संसर्गाची भीती न बाळगता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याने त्यांना देखील फ्रंटलाइनचे कोरोनायोद्धा म्हटले तर वावगे ठरणार नाही. (jalgaon news mahavitaran rain and storm line cut)

तालुक्यात पारोळा शहर, पारोळा ग्रामीण १, पारोळा ग्रामीण २, मंगरुळ, बहादरपूर, मोहाडी व तामसवाडी अशी ७ बीट, पारोळा, रत्नापिंप्री, मंगरुळ, तामसवाडी, बहादरपूर व सावखेडा होळ अशी ६ उपकेंद्र व ४५ हजारांवर ग्राहक असताना फक्त ९० कर्मचारी हे प्रामाणिक जबाबदारी सांभाळत अखंडितपणे वीजपुरवठा करीत आहेत. दरवर्षी जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या चार महिन्यात मॉन्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीची कामे करावी लागतात. ही कामे महावितरणचे कर्मचारी मे महिन्यातच करीत असल्याने तांत्रिक बाब वगळता अखंडित वीजसेवा देण्याचा प्रयत्न लाइनमन व इतर कर्मचाऱ्यांनी केला आहे.

चक्रीवादळाचा फटका

वीजबिले वाटप, वसुलीसह दुरुस्तीची कामे लाइनमन यांना करावी लागतात. हे करीत असताना मॉन्सूनपूर्व काळात चक्रीवादळ व वाऱ्यामुळे तारा, खांब रस्त्यावर पडणे, तारांवर झाड कोसळणे, यामुळे वीज ट्रिप होते. अशा काळात लाइनमन जिवाची पर्वा न करता वीजपुरवठा तत्काळ कसा सुरू होईल, याबाबत सतर्क राहत असल्याने महावितरण देखील नागरी सेवेत मौलिक कार्य करीत आहे, हे विसरता येणार नाही.

कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

तालुक्यातील अनेक बीट व कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा देखील करण्यात आल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

तांत्रिक बाब वगळता नागरिकांना नित्य वीजसेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोरोना उच्चाटनासाठी सामूहिक जबाबदारी महत्त्वाची आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांचे लसीकरण बाकी आहे. याबाबत प्रशासनाने फ्रंटलाइन योद्धाप्रमाणे लाइनमन व अभियंता यांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे.

- पी. एम. पाटील, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, पारोळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : आमदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने केला निषेध

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT