storm storm
जळगाव

रावेर तालुक्यात आठवड्यात तिसऱ्यांदा वादळी तडाखा

सातपुड्याच्या पाल व गुलाबवाडी परिसराला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला

सकाळ डिजिटल टीम


रावेर/पाल, : तालुक्यातील पाल, गुलाबवाडी परिसरात वादळी (storm) पावसाच्या तडाख्यामुळे (Rain) शेती शिवारातील (farmer) केळीबागाचे नुकसान झाले. घराचे पत्रे उडाल्याने कुटुंब उघड्यावर आले असून, विजेचे खांब वाकले, तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली. तालुक्याला एका आठवड्यात तिसऱ्यांदा वादळी पावसाचा तडाखा बसल्यामुळे ऐन कापणीवर आलेले केळीचे पीक जमीनदोस्त होऊन तालुक्यातील शेतकऱ्यांवर नुकसानीचे (Farmer crisis) मोठे आर्थिक (Economic) संकट उभे ठाकले आहे.

(raver taluka one week third time storm)


सातपुडा (Satpuda) पर्वत भागात शनिवारी (ता. २९) दुपारी साडेतीनच्या सुमारास पाल व गुलाबवाडी शिवारात झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात ऐन कापणीवरील आलेल्या केळीबागा व बरीचशी झाडे उन्मळून पडली. केळी पीक जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले. पाल परिसरात काही प्रमाणात केळीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच काही शेतात कापणीवरील असलेल्या मूग या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर या वादळी पावसामुळे दोन्ही गावांतील अनेक घरांचे पत्रे, कौलारू छपरे उडून अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले. वीटभट्ट्यांचेही नुकसान झाले आहे. वीजखांब व वीजतारा पडून वीजपुरवठा खंडित झाला आहे.

लाखोंचे नुकसान

तेजा पवार व करणसिंग पवार यांच्या शेतातील मुगाचे मोठे नुकसान झाले. गुलाबवाडी, रस्त्यावरील मंजुळा चौधरी यांचे सहा एकर केळी पीक जमीनदोस्त होऊन लाखोंचे नुकसान झाले. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील आंबा, लिंबू, रामफळ, पेरूची झाडे उन्मळून पडल्यामुळे नुकसान झाले.

तिसऱ्यांदा चक्रीवादळ
रावेर तालुक्यात शेतकरीवर्ग कमालीचा संकटात आला आहे. २१ मेस तालुक्यातील पश्चिम-उत्तर भागातील अहिरवाडी पाडळा, मोहगण परिसरात, गुरुवारी (ता. २७) तापी नदी पट्ट्यात २३ गावांतील ७५८ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकांचे सुमारे तीस कोटी रुपयांचे नुकसान झाले. तर शनिवारी दुपारी सातपुड्याच्या पाल व गुलाबवाडी परिसराला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. यात कोट्यवधी रुपयांचे केळी पीक उद्ध्वस्त झाल्याने तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी नेस्तनाबूत झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT