जळगाव

राज्यव्यापी गणनेत साडेतीन हजार चिमण्यांची झाली नोंद 

सचिन जोशी

जळगाव : नुकत्याच पार पडलेल्या जागतिक चिमणी दिनी निसर्गमित्रतर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्रव्यापी ऑनलाईन चिमणी गणनेत ३५९३ चिमण्यांची नोंद करण्यात आली. 
कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा चिमण्यांची गणना ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली. त्यासाठी विशिष्ट नमुन्यातील फॉर्म उपलब्ध करुन देत पक्षीप्रेमींना त्यांच्या घर व परिसरात निरीक्षण करुन चिमण्यांची नोंद करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. 

राज्यभरातून प्रतिसाद 
या अभिनव उपक्रमात महाराष्ट्रातील चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, अमरावती,अकोला, जळगाव, धुळे, नाशिक, परभणी, नगर, सोलापूर, नाशिक, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, सांगली, सातारा तसेच महाराष्ट्र बाहेरील इंदूर, रायपूर, गोव्यामधील फोंडा ते अगदी बहरीनसारख्या देशातून ४१ गावातील १५७ पक्षीप्रेमी सहभागी झाले होते. 

अशा झाल्या नोंदी 
त्यातील ११९ जणांनी नर- १७०० आणि मादी- १४६१ स्वतंत्र नोंद घेतली त्या मिळून एकूण ३१६१ चिमण्यांची नोंद करण्यात आली. १४ जणांनी नर-मादी स्वतंत्र नोंद न घेता चिमण्यांची एकत्रित नोंद घेतली ती एकूण संख्या ४३२ इतकी भरली आणि २४ जणांना चिमण्या आढळल्या नाहीत. सर्वांत जास्त चिमण्या धुळे-७४८, ठाणे-३७७, सोलापूर-२७०, नाशिक -२०५, जिंतूर- १७२ या नुसार नोंद झाली. 

महत्त्वपूर्ण नोंदी 
गाव----सहभागी---- चिमण्यांची 
-------पक्षीमित्र-----नोंद 

चंद्रपूर --६---------९७ 
नाशिक----८------२०५ 
पुणे ------१२-------११६ 
अमरावती ---३----- ८९ 
नागपूर ------७------६० 
जळगाव ----६------१११ 
वर्धा -------२------८५ 
धुळे ------७------७४८ 
सोलापूर -----७---- २७० 
ठाणे ------८------३७७ 
मुंबई -----७------ १०४ 
जिंतूर -----१------१७२ 
बुलडाणा----१-----६८ 


चिमण्या हल्ली दिसत नाहीत, नाहीशा झाल्यात, असे बोलले जाते. परंतु, गेल्या काही वर्षांतील अभ्यासात आम्हाला शहर परिसरातील सर्व ठिकाणी कमी जास्त संख्येत चिमण्या आढळल्या. त्यामुळे चिमण्या नाहीशा झालेल्या नाहीत. तर त्या वाढत्या शहरी करणामुळे त्या वेशीकडे ढकलल्या जात 
आहेत. 
- राजेंद्र गाडगीळ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT