Accident
Accident 
जळगाव

गावाला येऊन आईची भेट घेतली..अन हीच भेट शेवटची ठरली

दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): पोटाची खळगी भरण्यासाठी धुळ्यात गेलेल्या वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील तरूणाच्या दुचाकीला आज सकाळी मोहाडी धुळे जवळ अज्ञात वाहनाने धडक (Accident) दिल्याने त्याचा मृत्यु (Death) झाला.आज पहाटे तो धुळ्याहून आईला (Mother) भेटण्यासाठी व रेशनवर आलेले धान्य घेण्यासाठी वरखेड्यात आला होता. मात्र त्याची ही भेट शेवटची ठरली. तरुणाच्या मृत्युमुळे त्याचा कोवळा संसार उघड्यावर पडला आहे.

वरखेडे येथील विजय बळीराम शिरसाठ (वय35) हा तरुण धुळे येथे पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासह राहत होता. वरखेडे येथे घरी वयोवृद्ध आई एकटी राहत होती. आईला भेटण्यासाठी व रेशनवर आलेले गहु तांदूळ घेण्यासाठी आज शनिवारी सकाळी 7 वाजता तो वरखेडे येथे गावी आला.आईची भेट घेतली,व रेशनवरील गहू, तांदूळ घेऊन तो सकाळी 10 वाजता आपल्या दुचाकीने धुळ्याकडे परतीच्या प्रवासाला निघाला. जातांना आईची ही शेवटची भेट असेल असे स्वप्नातही वाटले नसेल.काही वेळातच त्याच्या मृत्युची बातमी येवून धडकली.धुळे मोहाडीजवळ काळाने घात केला आणि अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने विजयचा जागीच मृत्यु झाला. त्याचे प्रेत शवविच्छेदनासाठी धुळे रूग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर सायंकाळी उशिरा त्याचेवर वरखेडे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुटूंब पडले उघडे

मृत विजय शिरसाठ याची घरची परिस्थिती हालाखीची होती. धुळ्यात तो काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकत होता. मात्र अपघाती मृत्युने त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.सकाळी धुळ्याहून जातांना पत्नीला पतीचे आणि त्यानंतर वरखेडेहून जातांना आईला मुलाचे शेवटचे दर्शन होईल अशी दुर्देवी वेळ येईल असे वाटले नव्हते मात्र नियतीने या गरीब कुटुंबावर काळाचा घाव घातला.काही तासापूर्वी भेटलेल्या मुलाचा मृतदेह पाहून आईने एकच हंबरडा फोडला. मृत विजयच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई असा परिवार आहे. या घटनेने वरखेडे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

MS Dhoni : MS धोनीमुळे हरली CSK? 'या' मोठ्या चुकीमुळे प्लेऑफचे तिकीट गेलं हातातून

Nancy Tyagi: 30 दिवस, 1000 मीटर कापड अन् 20 किलो वजन; कान चित्रपट महोत्सवात परिधान केला स्वत: शिवलेला ड्रेस, नॅन्सी त्यागी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT