जळगाव

तरुणाला मारहाण करीत दोरीने गळा आवळून खून.. पारोळा शहरात खळबळ

सकाळवृत्तसेवा

पारोळा ः शहरातील शेवडी गल्लीत मंगळवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास फोन वर कोणाशी बोलत आहे हे सांग नाहीतर मारून टाकू या कारणावरून एका चोवीस वर्षीय तरुणाला नऊ जणांनी लाथाबुक्यांनी मारहाण करीत दोरीने फास लावून मारून टाकल्याची खळबळजनक घटना घडली.सदर घटनेमुळे  शहर हादरले असुन दिवसभर खुनाची चर्चा राहिली.
 
शहरातील मध्यवर्ती भागातील शेवडी गल्लीत मंगळवारच्या मध्यरात्रीत सुमारे साडेअकरा वाजेच्या सुमारास भूषण रघुनाथ चौधरी (वय 24) हा जेवण करून बसला होता त्याला फोन आल्याने तो बोलण्यास बाहेर आला. फोन वर बोलत असतांना त्यावेळी त्यांच्या गल्लीतील रावा भटू चौधरी, शांताराम भटू चौधरी, राजेश शांताराम चौधरी, विठोबा दयाराम चौधरी, ज्ञानेश्वर भटू चौधरी,जगदीश शांताराम चौधरी, कमलबाई शांताराम चौधरी, स्वीटी शांताराम चौधरी, मिनाबाई ज्ञानेश्वर चौधरी, अशांनी संगनमत करून गैर कायद्याची मंडळी जमवुन आमच्या घरासमोर येऊन रावा चौधरी यांनी फरशीच्या तुकड्याने भूषण याच्या डोक्यात मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच संशयीतांनी भूषणचा दोरीने गळा आवळून खुन केल्याचे भूषणचा मोठा भाऊ पंकज रघुनाथ चौधरी यांनी पारोळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी नऊ संशयीताच्या विरुद्ध  खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

कुटूंब वाचविण्यास धावले...पण त्यांना मारहाण
भूषण यास मारहाण होत असतांना भाऊ, वहिनी, आई-वडील असे त्यांना आवरण्यास गेले असता ज्ञानेश्वर भटू चौधरी याने त्याचे हातातील विटने फिर्यादीच्या गुडघ्यावर मारून दुखापत केली. आई व वहिणीला मारहाण केली. घटनास्थळी चाळीसगाव विभागीय पोलीस अधिकारी सचिन गोरे,अमळनेर विभागीय पोलीस अधिकारी अग्रवाल, पारोळा सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, सुदर्शन दातीर, पोउनि गणेश मुर्हे, यांनी भेट दिली या घटनेचा पुढील तपास सपोनि निलेश गायकवाड हे करीत आहेत.

खरे कारण गुलदस्त्यात
मयत भूषण चौधरी याच्यावर आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण पारोळा शहर हादरले होते, या परिसरात कमालीची शांतता पसरली होती. मोबाईल  वर कोणाशी बोलत होता सांग नाहीतर मारून टाकू असे सांगणारे आरोपी व नाव न सांगणारा भूषण यांच्यात जोरदार वाद होऊन मारहाण झाली या मारहाणीतून वाद इतका विकोपाला की त्यास फरशीने डोक्याला मारून  दोरीने गळफास देऊन मारून टाकण्यात आले यामुळे फोन वर बोलण्याचं कारण गुलदस्त्यातच राहिले व खुनाचे कारण समजू शकले नाही?
दरम्यान घटनेने सकाळपासून परिसर सुन्न झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : केरळमध्ये हत्तीच्या हल्ल्यात मल्याळम वृत्तवाहिनीचा कॅमेरामन ठार

SCROLL FOR NEXT