raksha bandhan
raksha bandhan 
जळगाव

कार असूनही ते ७० किमी सायकलींग करत बहिणीकडे...रक्षाबंधनाचा बहिणीचा गोड धक्‍का

दिलीप वैद्य

रावेर : पती– पत्नी दोघेही चांगल्या नोकरीवर, घरी चारचाकी गाडी पण सायकलिंगची आवड असल्याने भावाने आज जळगावहून रावेरपर्यंत ७० किलोमीटर थेट सायकलवर प्रवास करत बहिणीकडे राखी बांधून घेण्यासाठी अचानक भेट दिली. या अनोख्या रक्षाबंधनाबद्दल येथे चर्चेचा विषय झाला आहे.

जळगावच्या कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संगणक विभागात डॉ. अजय पाटील हे प्राध्यापक म्‍हणून कार्यरत आहेत. तर त्यांच्या पत्नी प्रा. नीता पाटील या देखील नोकरीला आहेत. डॉ. अजय पाटील यांना सायकलिंगची आवड आहे. नोकरी करीत असतांना बौद्धिक आणि मानसिक ताण असतोच. त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्यांनी नियमितपणे सायकलिंग सुरू केले. अलीकडे त्यांनी जळगाव येथून अजिंठा, पाचोरा, जामनेर येथपर्यंत सायकलने प्रवास केला आहे. नाशिकच्या सायकलिंग क्लबचे ते सदस्य आहेत.

बहिणीला गोड धक्‍का
राखीपौर्णिमा निमित्ताने त्यांनी अचानक रावेर येथील बहिणीला आश्चर्याचा गोड धक्का देण्याचे ठरवले. घरी कार असूनही सायकलवर ते रावेर येथे आले. येथील रामबाग मैदान परिसरातील प्रकाश पाटील (रा. उटखेडा) यांच्या पत्नी आणि प्राथमिक शिक्षिका पुष्पलता पाटील यांच्या भगिनी आहेत. सायंकाळी रक्षाबंधन आटोपून सायकलनेच ते जळगावला रवाना झाले.
 
संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT