banana wagons  banana wagons
जळगाव

रेल्वेने ऐनवेळी निर्णय बदल्ला..आणि केळी कापणी ठप्प !

केळी वाहतुकीत रेल्वे आणि लोकप्रतिनिधी राजकारण तर करीत नाही ना?

प्रविण पाटील

सावदा : येथील रेल्वेस्थानकावरील जीएस दर्जाचे सहा वॅगन्स अचानक रद्द करून त्या रावेर रेल्वेस्थानकावरून भरण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यामुळे सावदा परिसरातील केळी उत्पादकांवर हा अन्याय असून, या निर्णयामुळे केळी कापणी व वाहतूक ठप्प झाली आहे. लॉकडाउनमुळे केळीच्या बाजारभावात घसरण झाल्याने आधीच अडचणीत असताना केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

जीएस वॅगनवर तोडगा निघावा, यासाठी दोन एप्रिलला मुक्ताईनगर येथे खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत केळी व्यापारी व शेतकरी यांची संयुक्त बैठक झाली व तोडगा काढून सावदा रेल्वेस्थानक येथे सहा तर रावेर रेल्वेस्थानक येथे बारा अशी वॅगन वाटप करण्यात आली होती. तसे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील व्यवस्थापनाला देखील कळविण्यात आले होते. सावदा रेल्वेस्थानकावर सहा जीएस वॅगन मिळतील, असा निर्णय झाला असताना माशी नेमकी शिंकली तरी कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. केळी वाहतुकीत रेल्वे आणि लोकप्रतिनिधी राजकारण तर करीत नाही ना? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

सहाशे क्विंटल केळी कापणी ठप्प

सावदा रेल्वेस्थानकावरून भरली जाणारी जीएस वॅगन्स रद्द केल्याने सावदा परिसरातील सहाशे क्विंटल केळी कापणी ठप्प झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. आता या रेल्वे वॅगन रद्द होऊन त्या रावेर येथून भराव्यात, या मागे एका केळी व्यापाऱ्याच्या फायद्यासाठी राजकारण केले जात असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

दिवसभर घाम गाळून शेतकरी केळी पिकवतो. ती योग्य वेळी कापणी होऊन विकून मालाचे दाम मिळेल. या आशेवर तो असतो. पण सावदा रेल्वेस्थानकावरील नियोजित जीएस वॅगन रद्द झाल्याने केळी कापणी ठप्प झाली आहे. केळी व्यवसायात राजकारण होत असेल तर ते चुकीचे आहे. सावदा येथील वॅगन रद्द करण्यामागे लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे, अशी चर्चा आहे. तरी या पुढे तसे करू नये व सावदा येथील हक्काच्या जीएस वॅगन पुन्हा उपलब्ध करून द्याव्यात.

- अमोल पाटील, केळी उत्पादक शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मुंबईत पहिली लोकल दीड तास अडकली... मध्य रेल्वे सेवेत पुन्हा मोठा खोळंबा, अचानक पॉवर सप्लाय बंद!

Pune: गुंतवणूक, नोकरीच्या आमिषाने पुण्यात लूट; विश्रामबाग, नऱ्हे आणि खराडीत गुन्हे दाखल; तिघांना ६१ लाखांना गंडा

Pune News: धायरीत जलवाहिनीच फोडली; बेकायदा नळजोड घेणाऱ्यांवर महापालिका कारवाई करणार

Pune News: आधुनिकीकरणाच्या मार्गावर पीएमपीचा प्रवास; तांत्रिक प्रयोग यशस्वी; बहुतांश बसचे संचलन वेळापत्रकानुसार

Pune News: करिअरच्या असंख्य संधींवर मार्गदर्शन; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’

SCROLL FOR NEXT